खासदार संजय राऊत यांना मालेगाव न्यायालयाने दिली ही शिक्षा...

Share:
Main Image
Last updated: 23-Jan-2026

मालेगाव, (प्रतिनिधी) २३ जानेवारी - शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना मालेगाव न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी न्यायालयाने राऊत यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. गिरणा साखर कारखाना खरेदी व्यवहारावरून केलेल्या आरोपांनंतर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय?

मालेगाव जिल्ह्यातील दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखाना १५ वर्षांपूर्वी अवसायनात निघाला होता. हा कारखाना मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित एका कंपनीने २७ कोटी १५ लाख रुपयांना खरेदी केला होता. या व्यवहार काळात दादा भुसे यांनी मालेगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांकडून कारखान्याचे भागभांडवल जमा केले होते.

खासदार संजय राऊत यांनी आपल्या बातमीच्या माध्यमातून दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भुसे यांनी शेतकऱ्यांकडून जमा केलेले सुमारे १७८ कोटी रुपये कारखान्यासाठी न वापरता स्वतः हडप केले, असा दावा राऊत यांनी केला होता. या आरोपांमुळे आपली जनमानसात प्रतिमा मलीन झाल्याचे सांगत दादा भुसे यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते.

न्यायालयाचा निकाल या प्रकरणी मालेगाव न्यायालयात सुनावणी पार पडली. पुराव्यांची शहानिशा केल्यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी धरत एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. राजकीय वर्तुळात या निर्णयाची मोठी चर्चा होत असून, बिनबुडाचे आरोप करणे राऊत यांना महागात पडल्याची टीका सत्ताधारी गटाकडून केली जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.