तारण ठेवलेल्या घराची परस्पर विक्री... असे झाले उघड...

Share:
Last updated: 21-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ जानेवारी - हात ऊसनवार घेतलेल्या पैशांच्या मोबदल्यात तारण गहाण ठेवलेल्या घराची एकाने परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत ६२ वर्षीय व्यक्तीची ३८ लाख २५ हजार रूपयांची फसवणुक करण्यात आली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामराव किसन शिंदे (रा. पाटील गार्डन,पेठेनगररोड चार्वाक चौक,इंदिरानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत पुंडलिक सयाजी गांगुर्डे (६२ रा.मुरकुटे कॉलनी,नवीन पंडीत कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित व गांगुर्डे एकमेकांचे परिचीत आहे. सन.२०२०  मध्ये संशयित शिंदे याने गांगुर्डे यांची भेट घेतली होती. शेतजमिन खरेदी करीत असल्याचे भासवून त्याने गांगुर्डे यांच्याकडून ३८ लाख २५ हजार रूपये हात उसनवार घेतले होते. या मोबदल्यात त्याने आपले राहते घर गांगुर्डे यांना तारण गहाण करून दिले होते. त्याबाबत गहाण करारनामाही करण्यात आला होता. मात्र संशयिताने जमीन खरेदी केली नाही तसेच गांगुर्डे यांचे पैसेही परत केले नाही. कालांतराने संशयिताने आपले घर गागुर्डे यांची विचापूस न करता परस्पर विक्री केले असून हा प्रकार लक्षात येताच गांगुर्डे यांनी पोलीसात धाव घेतली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक डगळे करीत आहेत.

दुचाकीस्वाराने केली मंगळसुत्राची चोरी

नाशिक : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना आनंदवली भागात घडली. या घटनेत सुमारे ७० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र भामट्यांनी हिसकावून नेले असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया नाना धोंगडे (रा.प्रकाश रेसि.अपा.आनंदवलीगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. धोंगडे या सोमवारी (दि.१९) कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्या क्रोमा शोरूम समोरून आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. रस्त्याच्या कडेने त्या पायी जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. या गुन्ह्याचा  तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.