रिक्षाचालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार... असे झाले उघड...

Share:
Last updated: 19-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ जानेवारी - लग्नाचे आमिष दाखवून रिक्षाचालकाने वेळोवेळी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.  मुलगी गर्भवती राहून गोंडस बाळाला जन्म दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून, संशयितास तात्काळ अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहूल संतोष यादव (२५ रा.बालाजीनगर,नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. नाशिकरोड ते जेलरोड या रिक्षा पट्यावर सन. २०२४ मध्ये पिडीतेची संशयिताशी ओळख झाली होती. रिक्षा प्रवासात संशयिताने ओळख वाढवून हे कृत्य केले. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याने संशयिताने तुझ्या सोबत लग्न करतो असे सांगून मुलीस सायट्रीक ग्रांऊड शेजारी तसेच आयोध्यानगर, एकतानगर आणि ठाकरे मळा भागातील आपल्या भाडेतत्वावर घेतलेल्या घरी घेवून जात तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. मुलगी गर्भवती राहून तिने गोंडस बाळास जन्म दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून संशयितास तात्काळ अटक करण्यात आली आहे. या गुह्याचा तपास उपनिरीक्षक राहूल काकडे करीत आहेत.

 तडीपार जेरबंद

 हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणाऱ्या तडीपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या ही कारवाई संजय गांधी नगर येथील बुचडी ग्राऊंड भागात करण्यात आली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर मुन्ना शहा (४५ रा. भारतनगर मनपा शाळे मागे मुंबईनाका) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. शहा याच्या गुन्हेगारी कृत्यास रोखण्यासाठी शहर पोलीसांनी त्याच्या विरूध्द हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर व जिह्यातून त्यास दोन वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आलेले असतांना त्याचा वावर शहरातच होता. पोलीस त्याच्या मागावर असतांना तो रविवारी (दि.१८) सकाळच्या सुमारास बुचडी ग्राऊंड जवळील सहा चाळ भागात मिळून आला. अंमलदार पाटोळे यांच्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी याबाबतची नोंद करण्यात आली असून या गुह्याचा तपास हवालदार बोरसे करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.