बहिणीच्या मैत्रिणीचा विनयभंग संशयिताला बेड्या... पवननगर भागातील घटना...

Share:
Main Image
Last updated: 19-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ सप्टेंबर - बहिणीच्या मैत्रिणीचा विनयभंग करून तिच्या भावाला शिवीगाळ व धमकी देणाऱ्या एका संशयिताला अंबड पोलिसांनी त्वरित कारवाई करत अटक केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणजीत फकीरचंद ठाकरे (रा. रायगड चौक, सिडको) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

बाळाला खेळवताना केला विनयभंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गेल्या बुधवारी (९ सप्टेंबर) प्रसूत झालेल्या आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी संशयित रणजीत ठाकरे याच्या घरी गेली होती. घरी गेल्यानंतर तरुणी मैत्रिणीच्या नवजात बाळाला मांडीवर घेऊन खेळवत होती. याच वेळी पाठीमागून आलेल्या संशयित रणजीतने तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला.

पाठलाग करून भावाला धमकी

Advertisement

या धक्कादायक प्रकाराकडे कानाडोळा करत पीडित तरुणी दुपारी आपल्या भावासोबत क्लासला जाण्यासाठी निघाली. मात्र, संशयिताने त्यांचा पाठलाग केला. पवननगर परिसरात आल्यानंतर संशयिताने बहीण-भावाची वाट अडवून तरुणीचा पुन्हा विनयभंग केला. यावेळी तरुणीच्या भावाने संशयिताला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, संशयिताने त्याला तीव्र शिवीगाळ करत "तुला बघून घेतो," अशी थेट धमकी दिली.

संशयितास अटक; तपास सुरू

या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने तत्काळ अंबड पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली व फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित रणजीत ठाकरे याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पलांडे करत आहेत.

त्रिमूर्ती चौकात एकाची आत्महत्या

सिडकोतील त्रिमुर्तीचौक भागात राहणाºया ४० वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गुणवंत एकनाथ वाणी (रा.शिवशक्तीचौक ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुणवंत वाणी यांनी गुरूवारी (दि.१७) सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील अ‍ँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. हवालदार महाजन या घटनेचा तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.