दणकट वस्तू डोक्यातच टाकली... जन्मदात्या आईची मुलाने केली हत्या...

Share:
Main Image
Last updated: 15-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १५ सप्टेंबर - दारू किंवा कोणत्यातरी अमली पदार्थाच्या नशेत मुलाने केलेल्या गंभीर मारहाणीत आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील हनुमान नगर परिसरात घडली आहे.

घटनेचा सविस्तर तपशील:

गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील होमिओपॅथी कॉलेजच्या पाठीमागे, हनुमान नगर (नाशिक) येथे राहणाऱ्या कमलाबाई आणाजी वळवी (वय अंदाजे ४० वर्षे) यांच्यावर दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी ही प्राणघातक वेळ आली.

कमलाबाई यांचा मुलगा नानाजी आणाजी वळवी याने नशेत असताना, कोणत्याही कारणावरून अज्ञात कारणाने किंवा अज्ञात वस्तूने/टणक पदार्थाने आईच्या डोक्यावर गंभीर वार केले. या मारहाणीमुळे कमलाबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव झाला.

Advertisement

वैद्यकीय उपचार आणि मृत्यू:

घटनेनंतर जखमी कमलाबाई यांना तातडीने पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (CIVIL Hospital) दाखल करण्यात आले. त्यांना त्यांची नात सोनाली गजानन डबाळे (रा. द्वारका) व पोलीस अमलदार दीपक भगवान गावित यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास रुग्णालयात आणले.

मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. सकाळी १०:३५ वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. गावित मॅडम यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.