विकास नाशिककर, (नाशिक) १३ सप्टेंबर - भारतातील अग्रगण्य वाईनरिजपैकी एक असलेल्या ‘सुला विनयार्ड्स’ (Sula Vineyards) ने आपल्या हॉस्पिटॅलिटी आणि वाईन्स टुरिझम (Wine Tourism) क्षेत्रासाठी एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. ‘व्हिजिट सुला’ (visitsula.in) असे या समर्पित पोर्टलचे नाव असून, पर्यटकांना सुलाच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
‘Visit Sula’ प्लॅटफॉर्मची प्रमुख वैशिष्ट्ये:
वन-स्टॉप सोल्यूशन: पर्यटकांना एकाच वेबसाईटवर सुलाचे सर्व रिसॉर्ट्स, वाईनरी टूर्स आणि विविध हॉस्पिटॅलिटी सेवांची माहिती मिळेल.
एकदिवसीय ट्रिप आणि रिसॉर्ट बुकिंग: नाशिकमधील सुलाचे फ्लॅगशिप विनयार्ड आणि बेंगळुरूमधील ‘डोमेन सुला’ (Domaine Sula) या दोन्ही ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे पोर्टल उपयुक्त ठरेल.
स्टे आणि रिसॉर्ट्स: नाशिकमधील सुलाच्या प्रसिद्ध 'द सोर्स एट सुला' (The Source at Sula), 'बियॉन्ड बाय सुला' (Beyond by Sula) आणि 'द हेवन बाय सुला' (The Haven by Sula) या रिसॉर्ट्सचे बुकिंग आणि एक्सप्लोरेशन अधिक सोपे केले आहे.
इतर सुविधा: या प्लॅटफॉर्मवरून वाईनरी टूर्स, वाईन्स टेस्टिंग (Tasting), रेस्टॉरंट बुकिंग, शॉपिंग आणि द्राक्ष बागांच्या विविध अनुभवांची माहिती व बुकिंग करता येईल.
मोबाईल-फ्रेंडली डिझाईन: हे पोर्टल मोबाईल युजर्सचा विचार करून अत्यंत सोप्या आणि युजर-फ्रेंडली स्वरूपात तयार करण्यात आले आहे.
“पर्यटकांना आमच्यासोबतचा प्रवास प्लॅन करणे अधिक सोपे आणि प्रेरणादायी व्हावे, यासाठी आम्ही सर्व सेवा एकाच छताखाली आणल्या आहेत.”
— मोनित ढवळे, प्रमुख (हॉस्पिटॅलिटी), सुला विनयार्ड्स
या नवीन डिजिटल उपक्रमामुळे नाशिकच्या वाईन्स टुरिझम आणि पर्यटनाला अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.