तब्बल ८ किलो सोन्याचा ‘पंचमुखी मुकुट’... त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगास अर्पण केला जाणार...

Share:
Main Image
Last updated: 14-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १४ सप्टेंबर - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात पुढील वर्षी जानेवारी महिन्यात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या पाच दिवसीय सोहळ्यात भगवान त्र्यंबकेश्वराला २२ कॅरेट सोन्याचा, तब्बल ८ किलो वजनाचा आणि सुमारे ८ कोटी रुपये मूल्याचा भव्य 'पंचमुखी सुवर्णमुकुट' परिधान केला जाणार आहे.

भाविकांचे मोठे योगदान; 'पंचमुखी सुवर्णमुकुट' उपक्रम

मंदिर प्रशासनाच्या ‘पंचमुखी सुवर्णमुकुट’ या विशेष उपक्रमांतर्गत हा सुवर्णमुकुट साकारण्यात आला असून, त्यासाठी देशभरातील भाविकांनी मोलाचे योगदान दिले आहे.

Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली बैठक

या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नियोजन आणि तयारीबाबत आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या ऐतिहासिक आणि धार्मिक सोहळ्याची अधिकृत घोषणा लवकरच प्रशासनाकडून केली जाण्याची शक्यता आहे.

हा सुवर्णमुकुट अर्पण सोहळा देशाभरातील भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

Advertisement

Comments

No comments yet.