नाशिक पोलिसांचा जोरदार दणका... गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४०२ गुन्हेगारांना...

Share:
Main Image
Last updated: 12-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १२ सप्टेंबर - आगामी गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षित आणि निर्विघ्न वातावरणात पार पडावा यासाठी नाशिक शहर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर मोठी कारवाई केली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही परिमंडळांतील एकूण ४०२ उपद्रवी इसमांना थेट २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), २०२३ मधील कलम १६३ अन्वये ही व्यापक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, या कालावधीत संबंधितांना शहरात वास्तव्य करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.

परिमंडळनिहाय कारवाईचा तपशील:

 * परिमंडळ-१ (एकूण १२७ इसम):

  पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत—

   * मुंबईनाका: ३१

   * भद्रकाली: २४

   * पंचवटी: २२

   * गंगापूर: २२

   * सरकारवाडा: ११

   * म्हसरूळ: १०

   * आडगाव: ०७

Advertisement

  परिमंडळ-२ (एकूण २७५ इसम):

   पोलीस उप आयुक्त किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत—

   * सातपूर: ५३

   * उपनगर: ४६

   * नाशिकरोड: ४२

   * अंबड: ४०

   * इंदिरानगर: ३६

   * देवळाली कॅम्प: ३३

   * एमआयडीसी: २५

कडक बंदोबस्त, गस्त आणि सीसीटीव्ही निगराणी

सण-उत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या किंवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे. हद्दपारीच्या कारवाईसोबतच शहरात संवेदनशील ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त, वाहनांची व पायदळ गस्त, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चोख नजर ठेवली जात आहे.

पोलीस आयुक्तांचे शांततेचे आवाहन

नाशिककरांनी बाप्पाचा उत्सव अत्यंत उत्साहात, सुरक्षित व शांततापूर्ण वातावरणात साजरा करावा आणि शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.