बेदम मारहाण करत तरुणाला लुटले... डीजीपीनगर येथील प्रकार...

Share:
Main Image
Last updated: 12-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १२ सप्टेंबर -  नाशिक-पुणे महामार्गावरील डीजीपीनगर भागात एका तरुणाची वाट अडवून मारहाण करत, धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन जणांच्या टोळक्याने तरुणाच्या खिशातील रोख रक्कमेसह मोबाईल हिसकावून 'फोन पे'द्वारे (PhonePe) ऑनलाईन पैसेही ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी अडवून शिवीगाळ व मारहाण

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील सिंहस्थनगर भागात राहणारा रोहित शिवाजी शिंदे (वय ३२) हा तरुण गुरुवारी (दि. १०) रात्री नाशिकरोड भागातून काम आटोपून आपल्या दुचाकीने डीजीपीनगर मार्गे घराकडे परतत होता. रात्री आठ वाजेच्या सुमारास पंजाब अँड सिंध बँकेच्या परिसरात तीन अज्ञात भामट्यांच्या टोळक्याने त्याची दुचाकी अडवली.

Advertisement

खिशातील रोख रक्कम अन् ऑनलाईन पैसे ट्रान्सफर

संशयितांनी रोहितला विनाकारण शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्याच्या खिशातील २२० रुपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली. एवढ्यावरच न थांबता, भामट्यांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि 'फोन पे' ॲपच्या माध्यमातून १ हजार रुपये स्वतःच्या खात्यात ऑनलाईन वळते करून घेतले.

लूटमार केल्यानंतर तिन्ही संशयित घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर रोहित शिंदे याने उपनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्याच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.