नाशिकरोड बसस्टँड बंद झाल्याने सिटी बस कुठून मिळणार? हा बदल जाणून घ्या...

Share:
Main Image
Last updated: 12-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १२ सप्टेंबर - नाशिकरोड बसस्थानकाच्या जागेचे काँक्रीटीकरण करण्याचे काम महापालिकेतर्फे हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सोय व्हावी आणि वाहतूक कोंडी टळावी यासाठी 'सिटीलिंक' (Citilinc) बस सेवेने आपल्या विविध मार्गांवर तात्पुरते बदल लागू केले आहेत.

बस मार्गांमधील महत्त्वाचे बदल खालीलप्रमाणे:

 नाशिकरोड रेल्वे स्टेशन – त्र्यंबकेश्वर (मार्ग क्र. २४५ व १४५):

 या मार्गावरील फेऱ्यांच्या फेररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या फेऱ्या नेहमीप्रमाणे नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथूनच सुरू होऊन तेथेच येतील.

 नाशिकरोड रेल्वे स्टेशन – दिंडोरी (मार्ग क्र. २१०):

  या मार्गावरील बस फेऱ्यांमध्येही कोणताही बदल नाही. फेऱ्या नेहमीप्रमाणे नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथूनच सुरू व समाप्त होतील.

 इतर सर्व जाणाऱ्या बस फेऱ्या (मार्ग क्र. २१० व २४५ वगळून):

 नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या इतर सर्व मार्गावरील बस आता नाशिकरोड आगार – सिन्नर फाटा (मारुती मंदिर) – विभागीय आयुक्त कार्यालय – बिटको – दत्त मंदिर या मार्गाने पुढे जातील.

 इतर सर्व येणाऱ्या बस फेऱ्या (मार्ग क्र. २१० व २४५ वगळून):

 नाशिकरोडकडे येणाऱ्या इतर सर्व फेऱ्या दत्त मंदिर – उड्डाणपूल – सिन्नर फाटा (मारुती मंदिर) मार्गे नाशिकरोड आगारात येतील.

Advertisement

 तपोवन – सिन्नर (मार्ग क्र. १४६):

 जाताना: दत्त मंदिर – विभागीय आयुक्त कार्यालय – उड्डाणपुलाच्या रॅम्पवरून नेहमीप्रमाणे जातील.

 परतीची फेरी: सिन्नर फाटा (मारुती मंदिर) – विभागीय आयुक्त कार्यालय – बिटको – दत्त मंदिर या मार्गाने धावतील.

 पंचवटी ट्रेनला कनेक्ट करणाऱ्या सर्व बस फेऱ्या:

पंचवटी एक्स्प्रेसला जोडणाऱ्या सर्व बस फेऱ्या नेहमीप्रमाणे नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथूनच सुरू राहतील.

पूर्ण रात्रभर चालणाऱ्या सर्व बस सेवा:

रात्रकालीन (Night Service) सर्व बस फेऱ्या नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथूनच सुरळीत सुरू राहतील.

प्रवाशांना सहकार्याचे आवाहन

वाहनांचे सुधारित मार्ग तात्काळ लागू करण्यात आले आहेत. या बदलांमुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता असल्याने सिटीलिंक प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे आणि सर्व प्रवाशांनी या नवीन मार्गांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.