पुणे, (प्रतिनिधी) १२ सप्टेंबर - नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वापरणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि सतर्क करणारी बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळ आणि NSDL पेमेंट बँक यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले NCMC कार्ड रिचार्ज करताना कुठे रिचार्ज करता यावर तुम्हाला मिळणारी मूळ रक्कम अवलंबून आहे. खाजगी एजंटकडून रिचार्ज केल्यास प्रवाशांना थेट आर्थिक फटका बसत असल्याचे निदर्शनास आले आहे.
खाजगी एजंट आणि एसटी वाहकाकडून रिचार्जमधील फरक:
खाजगी एजंटकडून रिचार्ज केल्यास (सेवा शुल्क जास्त):
₹५० च्या रिचार्जवर कार्डमध्ये केवळ ₹३७.६७ जमा होतात.
₹१०० च्या रिचार्जवर ₹८७.१४ मिळतात.
₹२०० च्या रिचार्जवर ₹१८६.०८ मिळतात.
₹५०० च्या रिचार्जवर ₹४८२.८९ मिळतात.
₹१००० च्या रिचार्जवर ₹९७७.५८ जमा होतात.
एसटी महामंडळाच्या वाहकाकडून (Conductor) रिचार्ज केल्यास (कमी कपात):
₹५० च्या रिचार्जवर ₹४९.४७ मिळतात.
₹१०० च्या रिचार्जवर ₹९८.९४ मिळतात.
₹२०० च्या रिचार्जवर ₹१९७.८८ मिळतात.
₹३०० च्या रिचार्जवर ₹२९६.८२ मिळतात.
₹५०० च्या रिचार्जवर ₹४९४.७० मिळतात.
₹१००० च्या रिचार्जवर ₹९८९.४० जमा होतात.
प्रवाशांसाठी महत्त्वाची टीप:
NCMC कार्ड रिचार्ज केल्यानंतर मिळणारी ही रक्कम बस, मेट्रो, पार्किंग, टोल इत्यादी सर्व ट्रान्सपोर्ट सेवा वापरताना लागते. त्यामुळे प्रवाशांनी आपले NCMC कार्ड रिचार्ज करण्यापूर्वी मूळ मिळणारी रक्कम नक्की तपासून घ्यावी आणि शक्यतो एसटी वाहकाकडून किंवा अधिकृत केंद्रातूनच रिचार्ज करावे, जेणेकरून नाहक आर्थिक नुकसान टळेल.