कुंभमेळ्यात आयआयटी मुंबईसोबत काम करण्याची मोठी संधी...

Share:
Main Image
Last updated: 11-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ सप्टेंबर - आगामी 'सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७' च्या नियोजन आणि व्यवस्थापनात तंत्रज्ञान तसेच नवोन्मेषाचा (Innovation) प्रभावी वापर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कुंभ इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ साठी अर्ज करण्याची मुदत आता ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. कुंभमेळा प्राधिकरण आणि आयआयटी मुंबई (IIT Bombay) यांच्या संयुक्त विद्यमाने हे चॅलेंज आयोजित केले जात असून, स्टार्टअप्स, तंत्रज्ञान कंपन्या आणि संशोधकांना आपले तंत्रज्ञानाधारित उपाय सादर करण्यासाठी ही विशेष संधी उपलब्ध झाली आहे.

६ मुख्य विषयांवर शोधणार तंत्रज्ञानाधारित उपाय

कुंभमेळ्यात येणाऱ्या १२ कोटींहून अधिक भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी पुढील ६ प्रमुख थीम निश्चित करण्यात आल्या आहेत:

First Hour@Kumbh: भाविकांना कुंभनगरीत दाखल होताच मिळणारे मार्गदर्शन.

Swachh Kumbh 360°: स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन.

Kumbh SOS Grid: आपत्कालीन परिस्थितीतील जलद प्रतिसाद.

Godavari Guardian: गोदावरी नदीचे प्रदूषणमुक्त संरक्षण.

Kumbh Memories: कुंभाचा डिजिटल वारसा जपणी.

TruthShield Kumbh: अफवा आणि चुकीच्या माहितीला आळा घालणे.

'टेक मंथना'त होणार कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) चर्चा

Advertisement

या चॅलेंजसोबतच आयोजित करण्यात येणाऱ्या 'टेक मंथन'मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मानवी मूल्यांवर विचारमंथन केले जाईल. यामध्ये प्रामुख्याने:

AI आणि श्रद्धा

कुंभाचा डिजिटल वारसा

डीपफेकच्या युगातील सत्य आणि विश्वास

Sovereign AI आणि Data Sovereignty

यांसारख्या आधुनिक विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र होणार आहे.

कोणाला घेता येणार सहभाग?

या आव्हानात स्टार्टअप्स, स्केल-अप्स, तंत्रज्ञान कंपन्या, GovTech नवोन्मेषक, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि स्वतंत्र तज्ज्ञ सहभागी होऊ शकतात. सहभागींकडे प्रत्यक्ष कार्यरत उत्पादन (Working Product), प्रोटोटाइप किंवा ठोस संकल्पना असणे आवश्यक आहे.

"सिंहस्थ महाकुंभ मेळ्याचा मोठा आवाका लक्षात घेता, प्रत्यक्ष क्षेत्रात उपयोगी ठरणाऱ्या तंत्रज्ञानाची गरज आहे. नवोन्मेषकांनी या संधीचा लाभ घेऊन व्यवहार्य उपाय सादर करावेत."

— शेखर सिंह (आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण)

अर्जाची अंतिम मुदत: ३० सप्टेंबर २०२६

Advertisement

Comments

No comments yet.