प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार... मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड...

Share:
Main Image
Last updated: 11-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ सप्टेंबर - प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एका अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अत्याचारातून पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

शुभम प्रकाश दीपके (वय १९, रा. डे केअर स्कूलजवळ, नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित युवकाचे नाव आहे.

कुटुंबीयांच्या लक्षात येताच पोलिसांत धाव

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित शुभम आणि पीडित अल्पवयीन मुलगी हे एकमेकांच्या ओळखीचे होते. या ओळखीतूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याचा गैरफायदा घेत संशयिताने अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले.

दरम्यान, मुलीची प्रकृती खालावल्याने आणि ती गरोदर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आला. हादरलेल्या कुटुंबीयांनी मुलीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांत तक्रार नोंदवली.

या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, मुंबईनाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गौतम सुरवाडे या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.