तर तुमची गाठ माझ्याशी... आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कुणाला दिला सज्जड दम?

Share:
Main Image
Last updated: 11-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ सप्टेंबर -  मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अधिक पारदर्शी, अचूक आणि गतिमान करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रनिहाय 'बूथ लेव्हल एजंट' (BLA) ची तात्काळ नेमणूक करावी, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले. तसेच नाशिक जिल्ह्यातील आगामी मतदान केंद्रांची रचना पूर्णपणे 'मतदारस्नेही' (Voter-Friendly) करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्वपक्षीय आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार सीमा हिरे, नितीन पवार, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर आयुक्त अरविंद लोखंडे, मनपा अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व जिल्हा प्रशासनाची आकडेवारी:

४० लाख ७६ हजारांहून अधिक फॉर्म जमा: नाशिक जिल्ह्यात पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ४०,७६,६६६ मतदारांचे फॉर्म भरून घेण्यात आले आहेत.

१० लाख 'अनकलेक्टेबल' मतदारांची समस्या: जिल्ह्यात १०,२७,८९२ मतदारांचे फॉर्म 'अनकलेक्टेबल' (अपूर्ण/घर बंद/स्थलांतरित) आढळले आहेत. विशेषतः शहरी भागात हे प्रमाण अधिक असल्याने अशा मतदारांची स्थळपाहणी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. गेडाम यांनी दिले.

Advertisement

नाव वगळण्यापूर्वी नोटीस अनिवार्य: दुबार नोंदी, मृत्यू झालेल्या किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यापूर्वी वस्तुनिष्ठ पडताळणी करून संबंधित मतदाराला सुनावणीसाठी नोटीस देणे अनिवार्य असेल. कोणत्याही पात्र मतदाराचे नाव चुकीच्या पद्धतीने वगळले जाऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मतदारस्नेही मतदान केंद्र: भौगोलिक अंतर, मतदारांची संख्या आणि मूलभूत सुविधांचा विचार करून नागरिकांना मतदानाच्या दिवशी कोणताही त्रास होणार नाही, अशा सुलभ ठिकाणीच मतदान केंद्र निश्चित केले जाईल.

“मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामात प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या बीएलओंची (BLO) भूमिका महत्त्वाची आहे. या कामात कोणतीही दिरंगाई किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. राजकीय पक्षांनीही बीएलए नियुक्त करून प्रशासनाला सहकार्य करावे.”

— डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे (PPT) जिल्ह्यातील मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.