नाशिक, (प्रतिनिधी) ९ सप्टेंबर - नाशिक जिल्ह्याला Electric Vehicle (EV) आणि Electric Mobility क्षेत्रातील महत्त्वाचे राष्ट्रीय केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने नाशिक येथील Central Power Research Institute (CPRI) च्या विद्यमान परिसरात अत्याधुनिक Electric Vehicle (EV) Testing Facility / Centre of Excellence for EV Testing स्थापन करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. यासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांना पत्र दिले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक, इलेक्ट्रिकल आणि ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल तसेच ऑटोमोबाईल घटक निर्मिती उद्योगांचा भक्कम पाया आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ, तांत्रिक शिक्षण संस्था, औद्योगिक परिसंस्था आणि उत्तम दळणवळणाच्या सुविधा लक्षात घेता, Electric Vehicle क्षेत्राच्या विकासासाठी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात क्षमता उपलब्ध आहे, असे मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रात नमूद केले आहे.
नाशिक येथील CPRI केंद्राचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले आहे. त्यामुळे CPRI नाशिकच्या विद्यमान पायाभूत सुविधा आणि परिसराचा विस्तार करून त्याचा उपयोग नव्या व उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी करणे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.
देशात Electric Vehicles चा वापर तसेच त्यांची निर्मिती वेगाने वाढत आहे. त्यामुळे EVs, batteries, charging systems, power electronics आणि इतर EV components यांच्या testing, validation आणि certification साठी अत्याधुनिक व विश्वासार्ह सुविधांची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन नाशिकमधील CPRI केंद्रात स्वतंत्र EV Testing Facility उभारल्यास उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
प्रस्तावित EV Testing Facility मुळे नाशिकसह महाराष्ट्रातील EV उत्पादक आणि ऑटोमोबाईल घटक उत्पादकांना स्थानिक पातळीवर testing व certification सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे उत्पादकांचा testing आणि certification साठी लागणारा वेळ व खर्च कमी होण्यास मदत होईल. तसेच या सुविधेच्या माध्यमातून Electric Mobility क्षेत्रातील Research & Development, innovation आणि technology validation यांना चालना मिळेल. EV, battery technology, charging infrastructure, power electronics यांसारख्या क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक कौशल्य विकासाला मोठी संधी उपलब्ध होऊन नवीन रोजगारनिर्मितीलाही हातभार लागेल.
नाशिकमध्ये EV क्षेत्रासाठी अत्याधुनिक testing ecosystem निर्माण झाल्यास देशभरातील EV manufacturers आणि component manufacturers यांना नाशिककडे आकर्षित करण्यास मदत होईल. परिणामी नाशिकच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळून Electric Mobility च्या क्षेत्रात नाशिकची स्वतंत्र ओळख निर्माण होऊ शकते, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
नाशिकमध्ये आधीच निर्माण झालेल्या CPRI च्या पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करून त्याचा विस्तार EV Testing Facility साठी केल्यास महाराष्ट्रासह देशातील Electric Vehicle उद्योगाला मोठी चालना मिळू शकते. CPRI नाशिकच्या माध्यमातून नव्या पिढीच्या Electric Mobility तंत्रज्ञानासाठी एक महत्त्वाचे राष्ट्रीय स्तरावरील Centre of Excellence विकसित करण्याची ही योग्य संधी असल्याचेही मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रात नमूद केले आहे.
यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाकडे तसेच Central Power Research Institute (CPRI) कडे प्रस्तावाची शिफारस करून feasibility study आणि Detailed Project Proposal (DPR) तयार करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल यांच्याकडे केली आहे.
नाशिकच्या विद्यमान औद्योगिक क्षमतेला आधुनिक Electric Mobility तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास नाशिक हे भविष्यातील EV उद्योग, संशोधन, testing आणि innovation चे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून पुढे येऊ शकते, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे.