नाशिक जिल्हा सौरऊर्जेने उजळला... या कंपनीकडून ३२२ MW प्रकल्पांची यशस्वी उभारणी... कुणाला फायदा होणार?

Share:
Main Image
Last updated: 11-Sep-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) ११ सप्टेंबर - 'टोरेंट पॉवर'ची उपकंपनी असलेल्या 'टोरेंट ग्रीन एनर्जी' (Torrent Green Energy) ने नाशिक जिल्ह्यात विकेंद्रित सौरऊर्जा क्षेत्रातील एक मोठा टप्पा गाठला आहे. राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०' (MSKVY 2.0) आणि 'पीएम-कुसुम' (PM-KUSUM) योजनेअंतर्गत कंपनीने नाशिक जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ५० विविध ठिकाणी ३२२ मेगाव्हॉट (MWp) क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वित केले आहेत.

शेतकऱ्यांना दिवसा मिळणार हक्काची वीज

या महाकाय प्रकल्पाचा थेट फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागाला होणार आहे. कृषी वाहिन्यांचे (Agricultural Feeders) सौरीकरण करण्यात आल्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा अखंडित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:

२५ वर्षांचा करार: या प्रकल्पातून तयार होणारी वीज महावितरणला (MSEDCL) पुरवली जाणार असून, यासाठी २५ वर्षांचा वीज खरेदी करार (PPA) करण्यात आला आहे.

Advertisement

मोठे नेटवर्क: नाशिकमधील १४ तालुके आणि ५० वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रकल्प विस्तारलेले आहेत.

ग्रीडची क्षमता वाढणार: या विकेंद्रित प्रकल्पामुळे वीज वहिनादरम्यान होणारी गळती कमी होण्यास मदत होईल आणि ग्रामीण भागातील वीज वितरण यंत्रणा अधिक मजबूत होईल.

आव्हानांवर मात: जमीन संपादन, स्थानिक परवानग्या आणि ग्रीड कनेक्टिव्हिटी यांसारख्या आव्हानांवर मात करत टोरेंट समूहाने हे प्रकल्प वेळेत पूर्ण केले आहेत.

"महावितरण, स्थानिक प्रशासन, शेतकरी आणि जमीन मालकांच्या सहकार्यामुळेच हा भव्य प्रकल्प साकारणे शक्य झाले आहे. हरित आणि स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने हे आमचे एक महत्त्वाचे पाऊल आहे."

— जिगीष मेहता (पूर्णवेळ संचालक, टोरेंट पॉवर)

Advertisement

Comments

No comments yet.