नाशकात महिला आणि अल्पवयीन मुली असुरक्षित... एकाच दिवसात विनयभंगाचे ५ गुन्हे...

Share:
Main Image
Last updated: 08-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ८ सप्टेंबर - शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला असून, परक्यांपेक्षा परिचित व्यक्तींकडूनच महिला व मुली असुरक्षित असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शहरात एका अल्पवयीन मुलीसह एकूण पाच महिलांवर विनयभंग, ब्लॅकमेलिंग आणि मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी गंगापूर, आडगाव, भद्रकाली, इंदिरानगर आणि सातपूर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घडलेल्या ५ गंभीर घटनांचा थरार:

१. गंगापूर रोड (अल्पवयीन मुलीचे ब्लॅकमेलिंग):

बहिणीच्या मित्रानेच ओळख वाढवून एका अल्पवयीन मुलीला चिंतामणी मंगल कार्यालय परिसरात नेले. तिच्या बहिणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला. यानंतर वारंवार कॅफेमध्ये नेऊन ब्लॅकमेल करत विनयभंग केला. मुलीने प्रतिकार केला असता तिला मारहाण केली.

संशयित: सुरजसिंग गणेशसिंग परदेशी (२३, रा. सातपूर) - अटक करण्यात आली आहे.

तपास: सहाय्यक निरीक्षक हर्शल अहिरराव.

२. कोणार्क नगर (औषधाच्या बहाण्याने घरात घुसखोरी):

औषध घेण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या ५१ वर्षीय इसमाने महिलेचा विनयभंग केला. महिलेने प्रेमास नकार दिल्याने समाजात तिची बदनामी करण्यात आली.

संशयित: किशोर प्रभाकर थेटे (५१, रा. चांदशी).

पोलीस ठाणे: आडगाव पोलीस ठाणे (तपास: उपनिरीक्षक योगीता पाटील).

Advertisement

३. तपोवन लिंक रोड (सोसायटीतील प्रकार):

रविवारी (दि. ६) सकाळी दाराची बेल वाजल्याने पीडितेने दरवाजा उघडला असता, त्याच सोसायटीत राहणाऱ्या महेश सुतार नावाच्या संशयिताने महिलेचा विनयभंग केला.

पोलीस ठाणे: भद्रकाली पोलीस ठाणे (तपास: उपनिरीक्षक रणदिवे).

४. बापू बंगला परिसर (अपघातानंतर मारहाण व विनयभंग):

दुचाकीवरून जाणाऱ्या पीडित महिलेच्या गाडीला कारचा धक्का लागल्याने वाद झाला. कारचालकाने महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केला.

वाहनाचा क्रमांक: MH 15 JW 1864

पोलीस ठाणे: इंदिरानगर पोलीस ठाणे (तपास: हवालदार टिळेकर).

५. अशोकनगर, सातपूर (दिराकडून विनयभंग, सासरच्यांकडून मारहाण):

अशोकनगर भागात राहणाऱ्या विवाहितेचा गुजरात येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय दिराने विनयभंग केला. या घटनेबाबत पीडितेने वाच्यता केली असता, तिचे पती, सासू आणि जाऊ यांनी तिला शिवीगाळ करत मारहाण केली.

पोलीस ठाणे: सातपूर पोलीस ठाणे (तपास: हवालदार सूर्यवंशी).

Advertisement

Comments

No comments yet.