नाशिक मनपाचे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर... या १४ शिक्षकांचा होणार सन्मान...

Share:
Main Image
Last updated: 05-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ सप्टेंबर - शिक्षक दिनाचे औचित्य साधून नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारे सन २०२६ चे मानाचे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळांसह खासगी प्राथमिक शाळांमधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एकूण १४ शिक्षक व मुख्याध्यापकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

मनपा शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यादीनुसार मराठी, उर्दू आणि हिंदी माध्यमातील शाळांमधील शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.

पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नामावली:

मराठी माध्यम (मनपा प्राथमिक):

रंजना सखाराम मांडे (उपशिक्षिका, शाळा क्र. ७८, अंबड)

ज्योती त्र्यंबकराव भागवत (उपशिक्षिका, शाळा क्र. २९, कार्बननाका)

संगीता बाळासाहेब आढाव (उपशिक्षिका, शाळा क्र. ४९, पंचक)

संध्या उमाकांत जाधव (उपशिक्षिका, शाळा क्र. ७९, रायगड चौक)

शोभा सुनीलकुमार मगर (उपशिक्षिका, शाळा क्र. ७९, रायगड चौक)

योगेश महारू सूर्यवंशी (उपशिक्षक, शाळा क्र. ७४, जाधव संकुल)

उर्दू माध्यम (मनपा प्राथमिक):

नाझ परविन नदीम खान (मुख्याध्यापक, शाळा क्र. ८४, वडाळागाव)

तबस्सुम अब्दुल कादीर शेख (उपशिक्षिका, शाळा क्र. ८४, वडाळागाव)

हिंदी माध्यम (मनपा प्राथमिक):

राजश्री किशोरकुमार सोनेरी (मुख्याध्यापिका, शाळा क्र. १३, दिंडोरीनाका)

सचिन एकनाथ चिखले (उपशिक्षक, शाळा क्र. २७, सातपूर कॉलनी)

मनपा माध्यमिक विभाग:

दिलीप काळू गावित (उपशिक्षक, बी. डी. भालेकर शाळा, नाशिक)

अर्चना दिलीप कापडणीस (उपशिक्षिका, म्हसरूळ शाळा, नाशिक)

खासगी प्राथमिक विभाग:

रंजना विजय पाटील (उपशिक्षिका, अभिनव बालविकास मंदिर, नाशिक)

विशेष सन्मान:

कुंदा जयवंत बच्छाव (उपशिक्षिका, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या)

विविध माध्यमांचा समतोल

मनपा शिक्षण विभागाने पुरस्कारांची घोषणा करताना मराठी माध्यमासह उर्दू आणि हिंदी माध्यमातील उपक्रमशील शिक्षकांनाही योग्य प्रतिनिधित्व दिले आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षिकेचाही यात गौरव करण्यात आला असून लवकरच एका दिमाखदार समारंभात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

?s=20

Comments

No comments yet.