महिला कंडक्टरचा व्हिडिओ व्हायरल झाला... सिटीलिंक बस प्रशासनाने घेतला हा मोठा निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 04-Sep-2026

केशव खेडकर, (नाशिक) ४ सप्टेंबर - नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) अंतर्गत कार्यरत असलेल्या एका महिला वाहकाशी (कंडक्टर) संबंधित गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. याप्रकरणी महामंडळ प्रशासनाने अत्यंत कठोर आणि वेगाने पावले उचलत सदर व्हिडिओची तात्काळ दखल घेतली आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन प्राथमिक स्तरावर संबंधित महिला वाहकाला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

प्रशासकीय भूमिका आणि कठोर इशारा

या घटनेच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. सिटीलिंकच्या सेवेत कार्यरत असलेल्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने प्रवाशांशी अत्यंत सौजन्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि जबाबदार पद्धतीने वर्तन करणे बंधनकारक आहे. प्रवाशांना दर्जेदार, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख सेवा पुरवणे ही महामंडळाची मुख्य जबाबदारी असल्याचे प्रशासनाने आवर्जून सांगितले.

महामंडळाने स्पष्ट केले की, प्रवाशांशी गैरवर्तन करणे किंवा सेवाशिस्तीचा भंग करणे अशा कोणत्याही प्रकाराचे अजिबात समर्थन केले जाणार नाही.

Advertisement

सविस्तर चौकशी सुरू; पुढील कारवाईची तयारी

सध्या या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे. चौकशीअंती समोर येणारी वस्तुस्थिती आणि संबंधित घटकांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार पुढील कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

नागरिकांना आणि प्रवाशांना आवाहन

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या बाबींची आणि प्रवाशांच्या तक्रारींची अत्यंत गांभीर्याने दखल घेत आहे. भविष्यात प्रवाशांना असा कोणताही कटू अनुभव आल्यास किंवा बससेवेशी संबंधित कोणतीही अयोग्य घटना निदर्शनास आल्यास, नागरिकांनी त्याची थेट माहिती महामंडळाच्या अधिकृत तक्रार निवारण यंत्रणेकडे (Redressal System) नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.