महाराष्ट्रात प्रशासकीय फेरबदल.. ११ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या... पाहा कोणाची कुठे झाली नियुक्ती?

Share:
Main Image
Last updated: 04-Sep-2026

अक्षय काळे, (मुंबई) ४ सप्टेंबर - राज्यात प्रशासकीय पातळीवर बदल्यांचा धडाका सुरूच असून, गुरुवारी राज्य सरकारने एकाच वेळी ११ वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने (GAD) काढलेल्या या आदेशामुळे महसूल, जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास विभागातील विविध उच्च पदांवर मोठे फेरबदल झाले आहेत.

प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नवीन नियुक्त्या:

१. रवींद्र खेबुडकर (IAS):

जुने पद: मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), सिंधुदुर्ग जिल्हा परिषद.

नवीन पद: आयुक्त, भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा, पुणे.

२. डॉ. अपूर्वा बसूर (IAS):

जुने पद: सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार.

नवीन पद: मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), सिंधुदुर्ग जिल्हा परिषद.

३. विशाल खत्री (IAS):

जुने पद: प्रकल्प अधिकारी (ITDP) व सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू.

Advertisement

नवीन पद: मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), यवतमाळ जिल्हा परिषद.

४. गजेंद्र बावणे (IAS):

नवीन पद: संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, छत्रपती संभाजीनगर.

२०२४ बॅचच्या आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या:

डोनुरू अनन्या रेड्डी (IAS): प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू.

पी. के. सिद्धार्थ रामकुमार (IAS): प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार.

कुश मोटवानी (IAS): सहाय्यक जिल्हाधिकारी, वर्धा उपविभाग.

आकाश वर्मा (IAS): सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर.

शिवांश सिंह (IAS): प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी (गडचिरोली).

बदल्यांचे सत्र सुरूच

गेल्या काही दिवसांपासून राज्य प्रशासनात अधिकाऱ्यांच्या फेरबदलांची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. विशेषतः तरुण व नव्याने सेवेत आलेल्या अधिकाऱ्यांना जिल्हास्तरावर आणि आदिवासी/ग्रामीण भागात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊन प्रशासनाला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न या बदल्यांमधून दिसून येत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.