नाशिक, (प्रतिनिधी) ३ सप्टेंबर - शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०२६ च्या गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून एकूण १५ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
सन २०२६ च्या गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून एकूण ४३ प्रस्ताव प्राप्त झाले होते. प्राप्त प्रस्तावांमध्ये नमूद केलेल्या गुणवत्ता विषयक कामकाजाची तसेच शिक्षकांनी राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची शाळा व वर्गस्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणीची पडताळणी करण्यात आली. त्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांचे गट बदल करून प्रत्यक्ष मूल्यांकनाची कार्यवाही करण्यात आली.
गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले गुणांकन, शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, कामकाजातील नाविन्यता, राबविण्यात आलेले शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेले योगदान तसेच इतर निर्धारित निकषांचा विचार करून जिल्हास्तरीय निवड समितीने एकूण १५ शिक्षकांची सर्वानुमते गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. सदर निवडीस मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांनी मान्यता दिली आहे.
सन २०२६ गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेले शिक्षक
गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व १५ शिक्षकांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांनी केलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.