अंबड एमआयडीसीतील पोलिसांचा छापा... २३ जुगारींना रंगेहाथ पकडले...

Share:
Main Image
Last updated: 03-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी)  ३ सप्टेंबर - अंबड औद्योगिक वसाहतीमधील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मध्यरात्री छापा मारून धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २३ जुगारींच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून मोठी रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरानगर गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक इनकसिंग घुनावत यांना अंबड औद्योगिक वसाहतीतील 'हॉटेल महाराजा' येथे बेकायदेशीर तीन पत्तीचा जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने बुधवारी (दि. २) मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलवर अचानक छापा टाकला.

बंद खोलीत सुरू होता जुगार

Advertisement

हॉटेलमधील एका बंद खोलीत दीपक साळुंके (वय ४०, रा. भगतसिंग चौक, पवननगर) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून पैसे लावून 'तीन पत्ती' नावाचा जुगार खेळवत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जुगार खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या अशा एकूण २३ जणांना ताब्यात घेतले.

गुन्हा दाखल झालेले संशयित:

गणेश सुरेश वाघ, राहुल सूर्यभान गायकवाड, मिलिंद निवृत्ती भरीत (सर्व रा. सिडको/चुंचाळे), जावेद रज्जाक शेख (भद्रकाली), शांताराम विष्णू भरीत, विजय उत्तमराव कदम, जगदीश आनंदा निकुंभ, पंकज रामचंद्र शिंपी, समाधान सुरेश आरोटे, सुनील रामुरन प्रजापती, संदीप रवींद्र राजपूत, विकी मनोहर चौधरी, शरद वाळू काळे (सर्व रा. सिडको परिसरातील विविध भाग), अशोक सुकदेव पोकळे (निफाड), लहानू बाळू बागडे, रामदास वसंत रनमाळे, राजू विश्वास गतीर (सर्व रा. इगतपुरी), विजार मधुकर मोरे (विल्होळी), पंकज तुळशीराम जाधव (सातपूर), सचिन प्रकाश सोनवणे (इंदिरानगर), बाळासाहेब महादू सोनवणे (पाथर्डी फाटा), रवींद्र मारू ठाकरे (पंचवटी) आणि अजीज अब्दुल वहाब (चेतनानगर).

पोलीस पथकाने संशयितांच्या ताब्यातून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.