महापालिकेतही भाजपाच दादा, महायुतीला स्पष्ट बहुमत, बघा विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर

Share:
Main Image
Last updated: 16-Jan-2026

मुंबई (प्रतिनिधी) १६ जानेवारी - संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत महायुतीचे निर्विवाद वर्चस्व दिसून आले आहे. या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असून आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, मुंबईवर महायुतीची सत्ता जवळपास निश्चित झाली आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासासाठी मतदान करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी मोठ्या  प्रमाणात भाजप आणि महायुतीला मतदान केले. यामुळे, भाजपने या निवडणुकीत मोठी मुसंडी मारली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र येत महायुतीला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला. महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा मिळत असल्याने मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांसाठी झालेल्या या लढतीत बहुमतासाठी ११४ हा आकडा गाठणे आवश्यक आहे. ताज्या आकडेवारीनुसार, महायुतीने १२७ जागांवर आघाडी मिळवत बहुमताचा टप्पा पार केला आहे. यामध्ये भाजपने एकहाती ९६ जागांवर आघाडी घेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने ३१ जागांवर आघाडी घेतली आहे.

दुसरीकडे, ठाकरे बंधूंच्या युतीला (शिवसेना उबाठा आणि मनसे) ७१ जागांवर समाधान मानावे लागत असल्याचे दिसत आहे. यामध्ये उबाठाने ६२, तर राज ठाकरे यांच्या मनसेने ९ जागांवर आघाडी घेतली आहे. स्वबळावर लढलेल्या काँग्रेसला १३, तर राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या २ जागांवर आघाडी मिळाली आहे. विशेष म्हणजे, एमआयएमनेही मुंबईत ४ जागांवर विजय मिळवला आहे.

राज्यातील इतर महानगरपालिकांमध्येही महायुतीची कामगिरी चांगली असून, ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निकालामुले दोन दशके उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असलेली महापालिका आता महायुतीकडे गेली आहे. विकासाच्या मुद्द्यावर आणि महायुतीच्या एकत्रित ताकदीमुळे मुंबईकरांनी हा कौल दिल्याचे मानले जात आहे. 

विजयी उमेदवारांची नावे (वॉर्ड क्रमानुसार):

भाजप: तेजस्वी घोसाळकर (वॉर्ड २), प्रकाश तावडे (वॉर्ड १९), दीपक तावडे (वॉर्ड २०), विक्रम राजपूत (वॉर्ड ५०), हेतल गाला (वॉर्ड १०३), प्रकाश गंगाधरे (वॉर्ड १०४), प्रभाकर शिंदे (वॉर्ड १०६) नवनाथ बन (वॉर्ड १३५), राजश्री शिरवाडकर (वॉर्ड १७२), शिल्प केळुस्कर (वॉर्ड १७३), अजय पाटील (वॉर्ड २१४), संतोष ढोले (वॉर्ड २१५).

शिवसेना (ठाकरे गट): गीता भंडारी (वॉर्ड ३२), योगिता कदम (वॉर्ड ३७), जितेंद्र वळवी (वॉर्ड ५३), लोना रावत (वॉर्ड ७३), पूजा महाडेश्वर (वॉर्ड ८७), सुनील मोरे (वॉर्ड १२३), सकिना शेख (वॉर्ड १२४), मिलिंद वैद्य (वॉर्ड १८२), निशिकांत शिंदे (वॉर्ड १९४), उर्मिला पांचाळ (वॉर्ड २००).

शिवसेना (शिंदे गट): रेखा यादव (वॉर्ड १).

काँग्रेस: आशा काळे (वॉर्ड १८३), अश्रफ आझमी (वॉर्ड १६५), मोईन सिद्दिकी (वॉर्ड ३३).

एमआयएम: खैरुनिसा हुसेन (वॉर्ड १४५), मेहजबीन खान (वॉर्ड १३४).

(अपडेट निकाल पाहण्यासाठी या पेजला रिफ्रेश करावे)

Comments

No comments yet.