नाशिक सिटीलिंकचे नवीन पास केंद्र सुरू... शहरातील एकूण केंद्रांची संख्या आता १६ वर...

Share:
Main Image
Last updated: 02-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २ सप्टेंबर - नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) तर्फे शहर व परिसरातील प्रवाशांच्या सुविधेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून तपोवन आगारात नवीन पास केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून, त्यामुळे पंचवटी व तपोवन परिसरातील विद्यार्थी, नोकरदार आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तपोवन केंद्रावर सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत नवीन पास काढणे आणि जुन्या पासचे नूतनीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नवीन केंद्रामुळे आता नाशिक शहर व परिसरात सिटीलिंकच्या एकूण १६ पास केंद्रांमधून प्रवाशांना सेवा दिली जात आहे.

नाशिक शहरातील सिटीलिंक पास केंद्रांची यादी व ठिकाणे:

१. तपोवन आगार (नवीन सुरू झालेले केंद्र)

२. सीबीएस (CBS) मुख्य पास केंद्र

३. नाशिक रोड बस स्थानक / रेल्वे स्टेशन परिसर

४. सातपूर बस स्थानक / त्र्यंबक नाका

५. अंबड लिंक रोड / आगार

६. सिडको (लेखानगर / पवन नगर परिसर)

७. पंचवटी कारंजा

Advertisement

८. म्हसरूळ बस स्थानक

९. गंगापूर रोड (केबीटी कॉलेज जवळ)

१०. उपनगर नाका

११. देवळाली कॅम्प

१२. इंदिरानगर

१३. गोविंद नगर

१४. पाथर्डी फाटा

१५. द्वारका सर्कल

१६. भगूर बस स्थानक

(टीप: सर्व केंद्रांवर पास वितरणाची मुख्य वेळ सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० हीच राहिल.)

तपोवन आगारात सुरू झालेल्या या सुविधेमुळे स्थानिक प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचणार असून, नागरिकांनी या जवळच्या केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.