नाशिकच्या या कंपनीला मिळाले ६०२ कोटींचे कंत्राट... उत्तराखंड मध्ये साकारणार हा प्रकल्प...

Share:
Main Image
Last updated: 31-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) ३१ ऑगस्ट -  इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील नामांकित कंपनी अशोक बिल्डकॉन लि. (Ashoka Buildcon Ltd.) ला 'रेल विकास निगम लिमिटेड' (RVNL) कडून ६०२.१६ कोटी रुपयांचे (GST सह) मोठे कंत्राट मिळाले आहे. कंपनीला या कामासाठी RVNL कडून 'लेटर ऑफ एक्सेप्टन्स' (LOA) प्राप्त झाला असून, उत्तराखंडमधील महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाचा यात समावेश आहे.

प्रकल्पाचे स्वरूप आणि कामाचा विस्तार:

उत्तराखंडमधील ऋषिकेश-कर्णप्रयाग या नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाअंतर्गत (पॅकेज E-4) बोगदा क्रमांक T-13, T-14, T-15 आणि T-16 मध्ये इलेक्ट्रो-मेकॅनिकल (E&M) प्रणाली उभारण्याचे काम कंपनीला मिळाले आहे.

महत्त्वाची कामे: ३३/११ केव्ही आणि ११/०.४३३ केव्ही GIS सबस्टेशन्स, HT आणि LT केबल्स, जनरेटर सेट्स (DG Sets), लायटिंग, UPS सिस्टम, व्हेंटिलेशन सिस्टीम आणि अग्निशामक यंत्रणा (Fire-fighting systems) पुरवणे, बसवणे आणि त्यांची चाचणी घेणे.

Advertisement

कालावधी: कंत्राट सुरू झाल्यापासून ३० महिन्यांच्या आत हे सर्व काम पूर्ण करायचे आहे.

परफॉर्मन्स बँक गॅरंटी: कंपनीला या प्रकल्पासाठी २५.५१ कोटी रुपयांची परफॉर्मन्स बँक गॅरंटी द्यावी लागणार आहे. तसेच कामाच्या पूर्ततेनंतर २ वर्षांचा 'डिफेक्ट लायबिलिटी पिरियड' (दुरुस्ती कालावधी) असेल.

ऑर्डर बुक भक्कम, शेअर्सवर लक्ष:

रस्ते आणि महामार्ग बांधकामात अग्रेसर असलेल्या अशोक बिल्डकॉनने आता रेल्वे क्षेत्रातील या विशेष तांत्रिक कामामध्ये यश मिळवून आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणली आहे. या नवीन ६०२ कोटी रुपयांच्या कंत्राटामुळे कंपनीची एकूण ऑर्डर बुक (Order Book) अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात कंपनीच्या महसुलाला (Revenue Visibility) चांगला हातभार लागणार आहे.

Advertisement

Comments

No comments yet.