‘कुंभ भक्ती संगम' मध्ये आज दिवसभरात असे असतील जबरदस्त कार्यक्रम... मैथिली ठाकूर, आफळे महाराज...

Share:
Main Image
Last updated: 29-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २९ ऑगस्ट -  नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित ‘कुंभ भक्ती संगम’ या तीन दिवसीय महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच आज (शनिवार, २९ ऑगस्ट) नाशिककरांसाठी भक्तिसंगीताची मोठी मेजवानी सजणार आहे. सुप्रसिद्ध गायिका कु. मैथिली ठाकूर यांच्या सुरांनी आजची सायंकाळ न्हाऊन निघणार असून, त्यापूर्वी दिवसभरात संतपरंपरेवर विचारमंथन आणि ह.भ.प. डॉ. चारुदत्त आफळे यांचे ओघवते कीर्तन पार पडणार आहे. ठक्कर डोम येथे होणाऱ्या या संपूर्ण सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा (शनिवार, २९ ऑगस्ट):

१. भक्ती संमेलन सत्र १: 'भारतीय संत आणि समरसता' (सकाळी १० ते १२)

विषय: सिंहस्थ महाकुंभमेळा: भारतीय संत आणि समरसता

सत्र समन्वयक: ह.भ.प. श्री. पराग महाराज चातुर्मासे

सहभागी वक्ते: ह.भ.प. श्री. शिवाजी महाराज मोरे, श्री. ष. बृ. प्र. डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी, श्री. महंत श्रीमानस शास्त्री, श्री. सुदर्शन महाराज कपाटे, ह.भ.प. सौ. सुप्रियाताई साठे आणि ह.भ.प. श्री. प्रमोद महाराज जगताप.

२. भक्ती संमेलन सत्र २: 'संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय' (दुपारी २ ते ४)

विषय: सिंहस्थ महाकुंभमेळा: राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय

सत्र समन्वयक: ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे

सहभागी वक्ते: ह.भ.प. श्री. राणा महाराज वासकर, ह.भ.प. डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, श्री. जनार्दन हरिजी महाराज, ह.भ.प. श्री. रामकृष्ण महाराज वीर, श्री. मंदार बुवा रामदासी आणि भागवताचार्य प. पू. महंत श्री. चिरडे बाबा.

Advertisement

३. ह.भ.प. डॉ. चारुदत्त आफळे यांचे कीर्तन (सायंकाळी ५ ते ७)

संध्याकाळच्या सत्रात राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांच्या आख्यानाने भक्तीरस अधिक गडद होणार आहे.

४. मैथिली ठाकूर यांची 'भजन संध्या' (रात्री ८ ते १०)

दुसऱ्या दिवसाचे मुख्य आकर्षण म्हणजे युवा गायिका कु. मैथिली ठाकूर यांच्या सुरेल भजनांचा कार्यक्रम. आपल्या खास शैलीत लोकसंगीत आणि भजने सादर करत त्या नाशिककरांना मंत्रमुग्ध करतील.

नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

"पहिल्या दिवशी नाशिककरांनी 'कुंभ भक्ती संगम'ला दिलेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक होता. आजचा दिवस हा संतविचारांचे मंथन आणि मैथिली ठाकूर यांच्या सुरेल भजनांची पर्वणी घेऊन येत आहे. हा संपूर्ण कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून नाशिककरांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे."

— शेखर सिंह (आयुक्त, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण)

महत्त्वाची माहिती:

स्थळ: ठक्कर डोम, नाशिक

दिनांक: शनिवार, २९ ऑगस्ट २०२६

प्रवेश: सर्वांसाठी विनामूल्य

Advertisement

Comments

No comments yet.