खबऱ्याच्या इनपुटवर पुण्यात मोठी कारवाई... ३ घुसखोर बांगलादेशी सुरक्षा यंत्रणांच्या जाळ्यात...

Share:
Main Image
Last updated: 28-Aug-2026

पुणे, (प्रतिनिधी) २८ ऑगस्ट - शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात पुणे पोलीस आणि मिलिटरी इंटेलिजन्सने (MI) मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी दुपारी राबवलेल्या एका संयुक्त मोहिमेत तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले.

मिलिटरी इंटेलिजन्सला (पुणे) मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास सुरक्षा यंत्रणांनी ही कारवाई केली. सुरक्षा पथकाने अचानक टाकलेल्या या छाप्यामुळे संशयितांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. या कारवाईत सोनिया अख्तर, मोतियाल गाजी आणि सोनिया मोती पान या तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

प्राथमिक चौकशीदरम्यान या तिघांनी भारतात अवैध मार्गाने प्रवेश केल्याचे उघड झाले आहे. संबंधितांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असून, त्यांना बांगलादेशात परत पाठवण्याची (Deportation) प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या विशेष शाखेसह स्थानिक गुप्तचर यंत्रणांनी शहरातील संवेदनशील भागांत गस्त आणि तपास अधिक तीव्र केला आहे. शहरात कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्यास असलेल्या संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.