नाशिकच्या आयटी क्षेत्राची मोठी झेप... या कंपनीचे शेअर बाजारात पदार्पण... ५७६ कोटींचा आयपीओ...

Share:
Main Image
Last updated: 28-Aug-2026

केशव खेडकर, (नाशिक) २८ ऑगस्ट - नाशिकचे नाव तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पातळीवर नेणाऱ्या 'ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड' (ESDS Software Solution) या कंपनीने शेअर बाजारात पदार्पण करण्यासाठी मोठी झेप घेतली आहे. ईएसडीएसने ५७६ कोटी रुपयांच्या ताज्या भागभांडवल (Fresh Issue) वितरणासाठी भांडवल बाजार नियामक 'सेबी'कडे (SEBI) आपला 'ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस' (DRHP) दाखल केला आहे.

निधीचा वापर कशासाठी होणार?

आयपीओमधून मिळणाऱ्या ५७६ कोटी रुपयांच्या निधीचा मुख्य वापर कंपनीच्या डेटा सेंटर विस्तारासाठी केला जाणार आहे. ऐरोली (नवी मुंबई), बंगळुरू, मोहाली आणि नाशिक येथील डेटा सेंटर्समध्ये अत्याधुनिक क्लाउड कॉम्प्युटिंग आणि जीपीयू (GPU) उपकरणांची खरेदी व उभारणी या निधीतून केली जाईल.

काय आहे ईएसडीएसची ओळख?

२००५ मध्ये नाशिकमधून सुरू झालेली ईएसडीएस (ESDS) ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सक्षम क्लाउड आणि डेटा सेंटर सेवा पुरवणारी भारतातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीचे नाशिकसह देशोधात ६ हाय-टेक (Tier-3) डेटा सेंटर्स कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, कंपनीच्या स्वतःच्या 'स्वराज' (SWARAJ) या ऑटो-स्केलेबल क्लाउड तंत्रज्ञानाचे पेटंट भारत आणि अमेरिकेत नोंदणीकृत आहे. भारतामध्ये GPU-as-a-Service (GPUaaS) आणि क्लाउड सेवा पुरवणाऱ्या मोजक्या दोन कंपन्यांमध्ये ईएसडीएसचा समावेश होतो.

Advertisement

कंपनीची भक्कम आर्थिक कामगिरी (Financial Highlights)

गेल्या तीन वर्षांत कंपनीने आर्थिक क्षेत्रात चमकदार कामगिरी नोंदवली आहे:

महसूल (Revenue): आर्थिक वर्ष २०२४ मधील ₹२८६.५२ कोटींवरून वाढून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ₹४७२.२१ कोटींवर पोहोचला आहे.

निव्वळ नफा (PAT): कंपनीच्या निव्वळ नफ्यात विक्रमी वाढ झाली असून, आर्थिक वर्ष २०२४ मधील ₹१३.६१ कोटींचा नफा २०२६ मध्ये थेट ₹१२०.८२ कोटींवर पोहोचला आहे.

नाशिकच्या आयटी क्षेत्राला नवी भरारी

नाशिकमधून स्थापन झालेल्या एका आयटी कंपनीने थेट शेअर बाजारात ५७६ कोटींचा आयपीओ आणल्याने नाशिकच्या औद्योगिक आणि आयटी वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी आणि गुंतवणुकीला मोठे प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.