नेपाळमधील पूरस्थिती... अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी नाशिकला ही आहे हेल्पलाईन...

Share:
Main Image
Last updated: 26-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २६ ऑगस्ट - नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, विविध देशांसह भारतातील अनेक पर्यटक तेथे अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर अडकलेल्या नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी आणि त्यांची अचूक माहिती संकलित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (मंत्रालय, मुंबई) विशेष वेबलिंक उपलब्ध करून दिली आहे.

माहिती नोंदवण्यासाठी अधिकृत लिंक:

 https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

नाशिककरांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Advertisement

नाशिक जिल्ह्यातील कोणतेही नागरिक अथवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्यास त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी घाबरून न जाता वरील लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती तत्काळ भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नाशिक यांनी केले आहे.

नागरिकांना अधिक माहिती किंवा तातडीच्या मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल:

जिल्हा नियंत्रण कक्ष (नाशिक): ०२५३-२३१७१५१

कार्यालय: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.