नाशिक विभागीय आयुक्तालयात राडा... थेट शिपायाच्या कानशिलात लगावली...

Share:
Main Image
Last updated: 25-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ ऑगस्ट - विभागीय आयुक्तालयातील शिक्षण उपसंचालक कार्यालयात एका इसमाने शिपायाला कानशिलात मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्विय सहाय्यकाच्या (PA) दालनात बॅग ठेवण्यास मनाई केल्याच्या कारणावरून ही हाणामारी झाली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी (३५३) संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित अन् फिर्यादी:

या प्रकरणी जालिंदर कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित निलेश ओहल (वय ४२, रा. सुजाता अपार्टमेन्ट, एबीबी सर्कलजवळ, महात्मानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जालिंदर कापसे हे शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत.

नेमका काय घडला प्रकार?

Advertisement

सोमवारी (दि. २४) दुपारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर कापसे हे येणाऱ्या नागरिकांना अनुक्रमे साहेबांच्या भेटीसाठी सोडण्याचे काम पाहत होते.

स्वीय सहाय्यकाच्या कॅबीनमध्ये शिरण्याचा प्रयत्न: संशयित निलेश ओहल याने शिक्षण उपसंचालकांच्या दालनाबाहेर असलेल्या स्वीय सहाय्यकांच्या कॅबीनमध्ये जबरदस्तीने शिरून स्वतःची बॅग ठेवण्याचा प्रयत्न केला.

वाद अन् मारहाण: शिपाई कापसे यांनी त्याला कॅबीनमध्ये बॅग ठेवण्यास मनाई केली आणि नियमानुसार प्रतिक्षालयात बसण्यास सांगितले. याचा राग आल्याने संतप्त संशयिताने कापसे यांना अवाच्य भाषेत शिवीगाळ करत थेट त्यांच्या श्रीमुखात भडकवली.

कार्यालयातच शासकीय कर्मचाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार भोळे करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.