पती-पत्नीचा खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल... पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल...

Share:
Main Image
Last updated: 25-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ ऑगस्ट - पंचवटी परिसरात वास्तव्यास असलेल्या एका तरुण दाम्पत्याचा खाजगी व्हिडिओ अज्ञाताने मोबाइलमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित २१ वर्षीय विवाहितेच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात आयटी ॲक्टसह (IT Act) विविध कलमान्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्याचा हा अत्यंत खासगी व्हिडिओ कोणीतरी दूरवरून मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर प्रसारित केला. नातेवाईकांकडून या प्रकरणाची वाच्यता झाल्यानंतर दाम्पत्याने याची खात्री केली आणि तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. खासगी आयुष्यात डोकावून असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांचा शोध पोलीस घेत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.