नाशिकमध्ये भररस्त्यात डॉक्टरवर हल्ला... दुचाकीचा कट लागल्याच्या क्षुल्लक वादातून दगडफेक...

Share:
Main Image
Last updated: 24-Aug-2026

 

 

नाशिक, प्रतिनिधी (२४ ऑगस्ट २०२६) -

 

दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून एका कारचालक डॉक्टरला शिवीगाळ करत दगड फेकून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना व्हि. एन. नाईक कॉलेज परिसरातील गोल्ड जिम चौकात घडली आहे. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले असून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

डॉ. तेजस क्षीरसागर (रा. निर्मलनगर, बळी मंदिर, नाशिक) यांनी या प्रकरणी पोलीस फिर्याद दिली आहे.

नेमकं काय घडलं
डॉ. क्षीरसागर रविवारी (दि. २३) सातपूर येथील शिवतीर्थ हॉस्पिटलमधून आपली सेवा बजावून कारने घराकडे परतत होते.

गोल्ड जिम जवळील चौकात (एमएच १५ एच एन ४२२७) या क्रमांकावरील दुचाकीस्वाराने अचानक रस्ता ओलांडून भररस्त्यात वाहन थांबवले. त्यामुळे डॉक्टरांच्या कारचा दुचाकीला किरकोळ धक्का लागला.

धक्का लागताच संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने डॉ. क्षीरसागर यांना अर्वाच्य शिवीगाळ करत मारहाण केली आणि अचानक दगड फेकून मारला. या दगडफेकीत डॉक्टर जखमी झाले असून, संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार जाधव पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.