मित्र अन् त्याच्या मैत्रिणीच्या जाचाला कंटाळून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या...

Share:
Main Image
Last updated: 24-Aug-2026

 

 

नाशिक, प्रतिनिधी (२४ ऑगस्ट २०२६) -

मित्र आणि त्याच्या मैत्रिणीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक जाचाला कंटाळून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पेठरोडवरील पिंगळेनगर भागात घडली आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितांची नावे: दिशांत आहेर आणि खुशी (पूर्ण नाव अप्राप्त) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

घटनेची पार्श्वभूमी: मृत मुलीची इयत्ता १० वीत असताना दिशांतशी मैत्री झाली होती. या काळात दिशांतचे खुशी नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते.

Advertisement

मानसिक त्रास: दिशांतचा नाद सोड आणि त्याच्यापासून दूर राहा, या कारणावरून संशयितांनी मृत मुलीला सतत मानसिक त्रास दिला.

कठोर पाऊल: या त्रासाला कंटाळून मुलीने मंगळवारी (दि. ११) सायंकाळच्या सुमारास राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक म्हस्के पुढील तपास करत आहेत.

सिडकोत युवकाचा गळफास
सिडकोतील सावतानगर भागात राहणा
ऱ्या ३४ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहूल भागवत कांबळे (रा.शनि चौक, सावतानगर) असे मृत तरूणाचे नाव आहे. कांबळे याने रविवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्याच्या कडीला साडी बांधून गळफास लावून घेतला होता.

भाऊ राजेंद्र कांबळे यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. हवालदार गांगुर्डे तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.