नाशिकच्या स्टार्टअपची भरारी... देशभरातील जिम, डाएटिशियन आणि ट्रेनर्ससाठी वरदान...

Share:
Main Image
Last updated: 30-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३० ऑगस्ट - नाशिकच्या तंत्रज्ञान आणि फिटनेस क्षेत्रातील नावीन्यपूर्ण प्रयोगाने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्रातील आणि विशेषतः नाशिकमधील 'न्यूट्रिमेट वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड' (Nutrimate Wellness Pvt. Ltd.) या 'DPIIT' मान्यताप्राप्त स्टार्टअपने तयार केलेल्या 'FitVia' या प्लॅटफॉर्मने भारतीय फिटनेस उद्योगात मोठी क्रांती घडवून आणली आहे.

काय आहे ही 'व्हाईट-लेबल' ॲप संकल्पना?

पूर्वी कोणत्याही जिम किंवा फिटनेस सेंटरला स्वतःचे मोबाईल ॲप तयार करायचे असल्यास लाखो रुपयांचा खर्च आणि ६ ते ९ महिन्यांचा कालावधी लागायचा. परंतु, नाशिकच्या या स्टार्टअपने 'व्हाईट-लेबल' (White-Label) ॲप्सची संकल्पना आणली आहे. यामुळे कोणतेही जिम, डाएटिशियन, योग ट्रेनर किंवा फिजियोथेरपिस्ट अवघ्या काही दिवसांत स्वतःच्या नावाने आणि लोगोने (Logo) अँड्रॉइड व आयओएस (iOS) ॲप लाँच करू शकतात.

नाशिकच्या '२४ सेव्हन फिटनेस क्लब'चे यश

उत्तर महाराष्ट्रातील नामांकित असलेल्या नाशिकच्या '२४ सेव्हन फिटनेस क्लब' (24 Seven Fitness Club) ने ३ ऑगस्ट रोजी 'FitVia' च्या माध्यमातून स्वतःचे ब्रँडेड ॲप लाँच केले. ॲप सुरू झाल्यानंतर अवघ्या ९ दिवसांत दररोज ॲपद्वारे होणाऱ्या एंट्रीजमध्ये (Check-ins) १५ पटीने वाढ झाली असून, एका महिन्यात ४,००० हून अधिक ॲप एंट्रीज नोंदवल्या गेल्या आहेत.

या यशाबद्दल बोलताना २४ सेव्हन फिटनेस क्लबच्या संस्थापिका स्मिता भोसले म्हणाल्या,

"आजच्या सदस्यांना फक्त व्यायामशाळेतील साधने आणि एसी नको आहे. त्यांना त्यांच्या प्रगतीचा ट्रॅक आणि रोजचे मार्गदर्शन हवे आहे. स्वतःचे ॲप सदस्यांच्या मोबाईलमध्ये दिल्याने संभाषणाचा विषय मासिक फीवरून दैनंदिन प्रगतीवर (Daily Progress) आला आहे. यामुळे मेंबर्सचे रिन्यूअल (रजिस्ट्रेशन नूतनीकरण) प्रमाण मोठ्या प्रमाणावर सुधारले आहे."

'FitVia' ॲपची प्रमुख वैशिष्‍ट्ये:

स्वतःचा ब्रँड: जिम किंवा ट्रेनरच्या स्वतःच्या नावाने आणि लोगोने ॲप प्ले-स्टोअरवर उपलब्ध.

Advertisement

क्यूआर कोड हजेरी (QR Attendance): डिजिटल हजेरीमुळे जिगमधील गर्दीच्या वेळा आणि निष्क्रिय (Inactive) सदस्यांची माहिती थेट मिळणे सोपे.

व्हॉट्सॲप मील लॉगिंग (WhatsApp Meal Logging): ग्राहकाने काय खाल्ले याची नोंद थेट व्हॉट्सॲप संदेशाद्वारे घेण्याचे पेटंट-प्रस्तावित वैशिष्ट्य.

भारतीय आहाराचा डेटाबेस: १ लाखांपेक्षा जास्त भारतीय आणि प्रादेशिक पदार्थांची कॅलरी माहिती.

घरबसल्या लॅब टेस्ट: ॲपद्वारेच 'NABL' मान्यताप्राप्त लॅबमधून रक्त तपासणी व हेल्थ चेकअप बुक करण्याची सुविधा.

"पुढील दशक डिजिटल नात्यांचे!"

मुंबईतील 'योगानुभव'च्या संस्थापिका अनुया झेंडे आणि देशभरातील अनेक तज्ज्ञ आता नाशिकच्या या डिजिटल मॉडेलचा वापर करत आहेत.

या प्रवासाबद्दल बोलताना न्यूट्रिमेट वेलनेसच्या सह-संस्थापिका प्रज्ञा गणोरकर म्हणाल्या,

"भारतातील पुढील दशकातील फिटनेस लीडर्स तेच असतील, ज्यांचे आपल्या ग्राहकांशी दररोजचे डिजिटल संबंध (Daily Digital Relationship) घट्ट असतील."

नाशिकमधून सुरू झालेल्या या तंत्रज्ञानाला 'गूगल फॉर स्टार्टअप्स' (Google for Startups) आणि 'झोहो फॉर स्टार्टअप्स' (Zoho for Startups) चे पाठबळ लाभले आहे. नाशिकच्या एका स्थानिक कल्पकतेने देशातील फिटनेस उद्योगाला एक नवी दिशा दाखवून दिली आहे, हेच या बातमीतून अधोरेखित होते.

Advertisement

Comments

No comments yet.