कुंभमेळ्यासाठी २५४ कोटींचा आरोग्य आराखडा... ३५०० कर्मचारी अन् अद्ययावत सुविधांसह...

Share:
Main Image
Last updated: 23-Aug-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २३ ऑगस्ट - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाने अत्यंत गतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज करावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.  

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व सूचना:  

डिसेंबरची मुदत: शासकीय रुग्णालयांची प्रलंबित कामे मोहीम स्तरावर पूर्ण करून येत्या डिसेंबरपर्यंत ही रुग्णालये कार्यान्वित व समर्पित करावीत.  

२५४ कोटींचा आराखडा: महापालिका, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाने संयुक्तपणे २५४ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, कुंभमेळा कालावधीत सुमारे साडेतीन हजार (३,५००) आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ तैनात केले जाईल.  

आरोग्य पथके व रुग्णवाहिका: भाविकांच्या सुरक्षेसाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्यात येणार आहे. नदीकाठ, साधूग्राम, वाहनतळ आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष वैद्यकीय पथके तैनात केली जातील.  

Advertisement

विशेष आरोग्य उपाययोजना: भाविकांसाठी 'फ्ल्यू' प्रतिबंधक लसीकरणाबाबत जनजागृती करणे, जळीत रुग्णांसाठी (Burn Ward) अद्ययावत कक्ष उभारणे आणि औषध साठ्याचे आगाऊ नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.  

त्र्यंबकेश्वर रुग्णालय: त्र्यंबकेश्वर व परिसरातील स्थानिक रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून नवीन रुग्णालयासाठी पर्यायी जागा शोधताना सद्यःस्थितीतील बाह्यरुग्ण विभाग (OPD) सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.  

प्रतिनिधींनी मांडल्या मागण्या

या बैठकीस खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, सरोज अहिरे, हिरामण खोसकर, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी महिला रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालयातील सुविधा, किडनी विकार उपचार, सीटी स्कॅन सुविधा, आणि ट्रॉमा केअर सेंटर तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.