समुद्रातील गुप्त शत्रूंचा खात्मा करणार 'मंगरोल'... अत्याधुनिक टॉर्पेडो अन् रडारने सज्ज नौका भारतीय नौदलात...

Share:
Main Image
Last updated: 23-Aug-2026

अक्षय काळे, (मुंबई) २३ ऑगस्ट - भारतीय नौदलाची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी आणि सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेला बळ देण्यासाठी 'मंगरोल' ही अत्याधुनिक पाणबुडीरोधक नौका (Anti-Submarine Warfare Shallow Water Craft - ASW SWC) भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. कोची येथील 'कोचीन शिपयार्ड लिमिटेड' (CSL) द्वारे निर्मित ही या श्रेणीतील तिसरी नौका २१ ऑगस्ट २०२६ रोजी नौदलाच्या ताफ्यात अधिकृतपणे दाखल झाली.

८०% स्वदेशी बनावट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान:

'मंगरोल' ही नौका पूर्णपणे 'आत्मनिर्भर भारत' अभियानाचे उत्तम उदाहरण असून यात ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्याचा वापर करण्यात आला आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये: ही नौका 'वॉटरजेट्स'वर चालणारी असून समुद्राच्या कमी खोल पाण्यात टेहळणी करणे, किनारपट्टीलगतच्या भागातील पाणबुडीरोधक युद्ध मोहिमा, कमी तीव्रतेच्या सागरी कारवाया (LIMO) आणि सुरुंग-रोधक (Mine Warfare) मोहिमा राबवण्यासाठी सक्षम आहे.

Advertisement

अद्ययावत शस्त्रप्रणाली: ही नौका अत्याधुनिक पाणतीर (Torpedos), पाणबुडीविरोधी रॉकेट्स, प्रगत रडार आणि सोनार प्रणालीने सुसज्ज आहे.

नाव आणि ऐतिहासिक वारसा:

गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातील सागरी मत्स्यव्यवसायाचे प्रमुख केंद्र असलेल्या 'मंगरोल' या किनारी शहरावरून या नौकेचे नामकरण करण्यात आले आहे. यापूर्वी २००४ पर्यंत सेवेत असलेल्या 'माइनस्वीपर' या जहाजाचा वारसा या नवीन 'आयएनएस मंगरोल'च्या रूपाने जतन करण्यात आला आहे. महत्वपूर्ण युद्धनौकांची नावे कायम राखण्याच्या नौदलाच्या परंपरेचा हा एक भाग आहे.

भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीच्या प्रवासातील हा एक मैलाचा दगड ठरला असून यामुळे भारताच्या सागरी संरक्षणाला नवी धार मिळणार आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.