नाशिककरांचा प्रवास होणार सुखकर... १ सप्टेंबरपासून धावणार एवढ्या नवीन एसी ई-बसेस...

Share:
Main Image
Last updated: 23-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) २३ ऑगस्ट - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी नाशिक महापालिकेच्या 'सिटीलिंक' ताफ्यात नवीन २८ एसी ई-बसेस दाखल होणार आहेत. १ सप्टेंबरपासून या बसेस नाशिककरांच्या सेवेत रुजू होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात २१ बसेस: केंद्र सरकारच्या 'पीएम ई-बस योजने'अंतर्गत नाशिकला मंजूर झालेल्या ५० ई-बसेसपैकी पहिल्या टप्प्यात २१ बसेस शहरात पोहोचल्या आहेत. पुढील आठवड्यात आणखी सात बसेस ताफ्यात दाखल होतील.

Advertisement

एकूण ३०० बसेसचा ताफा: सध्या 'सिटीलिंक'कडे २०० सीएनजी आणि ५० ई-बसेस अशा २५० बसेस आहेत. या नव्या ५० ई-बसेसमुळे एकूण ताफा ३०० बसेसचा होणार आहे.

पर्यावरणपूरक प्रवास: या वातानुकूलित (AC) ई-बसेसमुळे डिझेलवरील खर्च वाचणार असून कार्बनचे उत्सर्जन कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

डेपोचे काम पूर्ण: आडगाव येथील ई-बस डेपोचे काम पूर्ण झाले असून जेबीएम इकोलाईफ मोबिलिटी प्रा. लि. कडे या बसेसच्या पुरवठा व संचालनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.