नाशिक शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट... वेगवेगळ्या भागांतून एवढ्या मोटारसायकली लांबवल्या...

Share:
Main Image
Last updated: 22-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २२ ऑगस्ट - शहर आणि परिसर दुचाकी चोरांच्या निशाण्यावर आला असून वेगवेगळ्या भागांतून तब्बल चार दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी म्हसरूळ, मुंबई नाका आणि गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

चोरीच्या घटनांचा तपशील:

म्हसरूळ परिसर: शिवसमर्थ नगर येथील वैभव शांताराम चौधरी यांची मोटारसायकल (MH 14 FW 9238) मंगळवारी (दि. १८) रात्री घरासमोरून चोरीला गेली. तर बोरगड येथील यश जयप्रकाश दुगल यांची पल्सर (MH 15 KH 9659) शुक्रवारी (दि. २१) रात्री सोसायटीच्या पार्किंगमधून लांबवण्यात आली. म्हसरूळ पोलिसांत गुन्हे दाखल असून हवालदार जाधव तपास करत आहेत.

Advertisement

मुंबई नाका परिसर: अंबड लिंकरोड येथील रहिवासी ललीत संतोष अलबाड यांची दुचाकी (MH 15 ER 5461) ठक्कर बाजारजवळील ईदगाह मैदानाच्या प्रवेशद्वारावरून गुरुवारी (दि. १३) चोरीला गेली. मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल असून हवालदार गायकवाड तपास करत आहेत.

गंगापूर परिसर: ध्रुवनगर येथील अंबादास वाल्मिक चंदने यांची प्लेझर स्कुटी (MH 18 AE 3345) रविवारी (दि. ९) रात्री सोसायटीच्या आवारातून चोरट्यांनी पळवून नेली. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून हवालदार ढमाले पुढील तपास करत आहेत.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनचोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून आरोपींचा तात्काळ शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.