वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू... शिंदे टोलनाक्याजवळील घटना...

Share:
Main Image
Last updated: 22-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २२ ऑगस्ट - नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोलनाका परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय पादचाऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उपचारादरम्यान अपयश

Advertisement

सुरेश उर्फ सूर्यभान उगले (वय ५५, रा. डोंगरगाव, ता. अकोला, जि. अहिलानगर) असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उगले हे २९ जुलै रोजी शिंदे गावातील टोलनाका परिसरात सुभाष पेट्रोल पंपासमोरून पायी जात असताना, एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

पोलिसांकडून वाहनाचा शोध सुरू

अपघातानंतर टोलनाक्याचे रुग्णवाहिका चालक अरुण जाधव यांनी जखमी उगले यांना तातडीने तुळशी हॉस्पिटलमार्फत जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी (दि. २१) उपचार सुरू असताना डॉ. रिजवान अहमद यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनचालकाचा पोलीस हवालदार मोरे हे पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.