मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर... तब्बल २३८ नवीन एसी लोकल...

Share:
Main Image
Last updated: 22-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २२ ऑगस्ट - मुंबई उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) अंतर्गत उपनगरीय रेल्वेसाठी २३८ नवीन वातानुकूलित (AC EMU) लोकल गाड्या निश्चित वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रेल्वे मंत्रालयाने कंबर कसली आहे. देशातील तीन मोठ्या रेल्वे कारखान्यांमध्ये या डब्यांच्या निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

कोणत्या कारखान्यात किती डबे तयार होणार?

रेल्वे बोर्डाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार, देशातील तीन प्रमुख उत्पादन केंद्रांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे:

इंटीग्रल कोच फॅक्टरी (ICF, चेन्नई): १२० एसी ईएमयू डबे/रेक

रेल कोच फॅक्टरी (RCF, कपूरथला): ७१ एसी डबे/रेक

मॉडर्न कोच फॅक्टरी (MCF, रायबरेली): ४७ एसी डबे/रेक

Advertisement

(एकूण २३८ वातानुकूलित ईएमयू रेक्सचे उत्पादन केले जाईल.)

२०२७ पासून पुरवठा सुरू; २०३० पर्यंत पूर्ण उद्दिष्ट:

मंजूर झालेल्या तांत्रिक मानकांनुसार (RDSO/ICF) या डब्यांची निर्मिती केली जाणार आहे, ज्यामुळे उत्पादन जलद गतीने होईल. या गाड्यांचा पुरवठा २०२७ पासून सुरू होणार असून, २०३० पर्यंत सर्व २३८ एसी रेक्स टप्प्याटप्प्याने मुंबई रेल्वेच्या ताफ्यात समाविष्ट करण्याचे नियोजन आहे.

मुंबईकरांना काय फायदा होणार?

सध्या मुंबई उपनगरीय मार्गावर पायाभूत सुविधांचा विस्तार होत असताना एसी लोकल गाड्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. २०२७ पासून नव्या गाड्या उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांची गर्दी विभागली जाईल, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल आणि उपलब्ध पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त वापर करणे शक्य होणार आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.