कॉलेजबाहेरील टवाळखोरांचा खूप त्रास... विद्यार्थिनींची अमित ठाकरेंकडे तक्रार...

Share:
Main Image
Last updated: 22-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २२ ऑगस्ट - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) अध्यक्ष अमित ठाकरे सध्या राज्यातील विविध महाविद्यालयांना भेटी देऊन 'जेन झी' (Gen Z) युवा पिढीशी थेट संवाद साधत आहेत. मुंबई दौऱ्यानंतर आता ते नाशिक दौऱ्यावर आले असून, या दौऱ्यादरम्यान नाशिक शहरातील उत्तम नगर परिसरातील एका कॉलेजला त्यांनी भेट दिली.

विद्यार्थिनींची थेट अमित ठाकरेंकडे तक्रार

कॉलेजला भेट दिल्यानंतर अमित ठाकरे यांनी तेथील तरुण-तरुणींशी विविध विषयांवर चर्चा केली. या संवादादरम्यान कॉलेजच्या विद्यार्थिनींनी आपल्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला. "कॉलेजच्या बाहेर रोज टवाळखोर उभे असतात आणि ते येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थिनींना त्रास देतात," अशी थेट तक्रार विद्यार्थिनींनी अमित ठाकरे यांच्याकडे केली.

टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

Advertisement

कॉलेज परिसरात भेडसावणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाचे आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. यावर अमित ठाकरे यांनी विद्यार्थिनींच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेत, या टवाळखोरांचा योग्य तो बंदोबस्त करण्यासाठी मनविसेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे विषय मांडण्याचे आश्वासन दिले.

अमित ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे नाशिकमधील कॉलेज विश्वात आणि तरुण वर्गात सध्या मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

हाकेवर पोलीस

विशेष म्हणजे याच कॉलेजपासून काही अंतरावर अंबड पोलिस स्टेशन आहे. पोलिसांचा धाक टवाळखोरांना नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.