मनोहर शिंदे, (नाशिक) २१ ऑगस्ट - महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार नाशिक महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांवरील सदस्यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये 'महिला व बाल कल्याण समिती', 'शहर सुधार समिती', 'वैद्यकीय व साहाय्य समिती', 'विधी समिती' आणि 'शिक्षण समिती' या प्रमुख पाच समित्यांवर प्रत्येकी ९ सदस्यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या सदस्यांची समितीनिहाय नावे खालीलप्रमाणे:
महिला व बाल कल्याण समिती
१. चित्रा तांदळे
२. भारती धिवरे
३. स्वाती भामरे
४. कोमल मेहेरोलिया
५. रुपाली निकुळे
६. ज्योती जोंधळे
७. इंदुमती नागरे
८. प्रमिला मैद
९. सीमा ठाकरे
शहर सुधार समिती
१. रुपाली ननावरे
२. उषा बॅंडकोळी
३. श्वेता भंडारी
४. जयंत जाचक
५. संध्या कुलकर्णी
६. प्रवीण जाधव
७. प्रमोद पालवे
८. योगेश भोर
९. जागृती गांगुर्डे
वैद्यकीय व साहाय्य समिती
१. वाळू काकड
२. सविता काळे
३. राहुल शेलार
४. साधना मटाले
५. सतीश निकम
६. डॉ. पूनम महाले
७. नितीन दातीर
८. वैशाली दळवी
विधी समिती
१. जुई शिंदे
२. अंकिता शिंदे
३. विश्वास नागरे
४. राजू आहेर
५. भूषण राणे
६. कविता नाईक
७. आशा तडवी
८. संजीवनी हंडोरे
९. मुकेश सहाणे
शिक्षण समिती
१. छाया देवांग
२. सोनाली भांडूरे
३. सचिन मराठे
४. शरद मोरे
५. शरद फडोळ
६. नयना जाधव
७. कैलास मुदलीयर
८. सीमा पवार
९. किरण राजवाडे
महापालिकेच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि विविध विभागांचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी या समित्यांची रचना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. नवनिर्वाचित सदस्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात असून लवकरच या समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.