स्वप्न होणार पूर्ण... इतक्या हजार शिक्षकांची मेगा भरती...

Share:
Main Image
Last updated: 20-Aug-2026

केशव खेडकर, (नाशिक) २० ऑगस्ट - राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण सेवकांची एकूण २ हजार ४२१ रिक्त पदे याद्वारे भरली जाणार आहेत, अशी माहिती आदिवासी विकास विभागाच्या उपायुक्त शशिकला अहिरराव यांनी दिली.

भरती प्रक्रियेची प्रमुख वैशिष्ट्ये:

विभागनिहाय पदे:

नाशिक विभाग: ८२६

ठाणे विभाग: ६१३

Advertisement

नागपूर विभाग: ५१४

अमरावती विभाग: ४६८

क्षेत्रनिहाय वर्गीकरण: स्थानिक व आदिवासी भागांतील उमेदवारांना न्याय देण्यासाठी पेसा (PESA) क्षेत्रासाठी ८८५ आणि नॉन-पेसा क्षेत्रासाठी १ हजार ५३६ पदांचे स्पष्ट विभाजन करण्यात आले आहे.

माध्यम व विषय: मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची भरती केली जाईल. यामध्ये मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचा समावेश आहे.

ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व गुणवत्ताधारित पद्धतीने पवित्र पोर्टलवर होत आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचाच पाठपुरावा करावा, असे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.