म्हाडाच्या बदलत्या नियमांचा गृहनिर्माणावर काय परिणाम? तुमच्या प्रश्नांना मिळणार थेट उत्तर...

Share:
Main Image
Last updated: 19-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १९ ऑगस्ट - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे (EWS) नवीन धोरण, अल्प उत्पन्न गटाचे (LIG) निकष आणि ‘म्हाडा’च्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर मंथन करण्यासाठी 'इंडियन फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स'तर्फे (iFACE) विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘iFACE UNFILTERED’ या उपक्रमांतर्गत हे खुले चर्चासत्र गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:४५ वाजता गंगापूर रोडवरील वैराज कलादालन येथे पार पडणार आहे.

शासनाच्या नवीन धोरणांचा आणि म्हाडाच्या बदललेल्या नियमांचा गृहनिर्माण व बांधकाम क्षेत्रावर काय परिणाम होणार, तसेच प्रकल्प राबवताना प्रत्यक्ष जागेवर कोणत्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी येत आहेत, यावर या सत्रात सविस्तर चर्चा होणार आहे. पारंपरिक व्याख्यानांऐवजी थेट प्रश्नोत्तरे, हरकती आणि विधायक सूचना मांडण्यासाठी या कार्यक्रमात मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. या संवादाचे संयोजन व सूत्रसंचालन iFACE चे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. विजय सानप करणार आहेत.

Advertisement

सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश

हे चर्चासत्र सर्वांसाठी खुले असून यासाठी संस्थेचे सभासद असण्याची अट नाही. स्थापत्य अभियंते, वास्तुविशारद (आर्किटेक्ट्स), नगररचनाकार, स्ट्रक्चरल इंजिनिअर्स, कन्सल्टंट्स, बांधकाम व्यावसायिक, विकासक आणि अभियांत्रिकी-वास्तुकला शाखेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न व अनुभव मांडावेत, असे आवाहन iFACE तर्फे करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.