नाशिक जिल्ह्यातील इतक्या लाख मतदारांचे नाव यादीतून डिलीट होणार... सर्वाधिक या मतदारसंघातील...

Share:
Main Image
Last updated: 18-Aug-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) १८ ऑगस्ट - जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्ह्याने ७९.८२ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण केले आहे. १७ ऑगस्ट अखेर जिल्ह्यातील एकूण ५१ लाख ४ हजार ४५८ मतदारांपैकी ४० लाख ७४ हजार २१४ अर्जांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. दुसरीकडे, अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नोंद (ASDD) या विविध कारणांमुळे १० लाख ३० हजार २४४ (२०.१८ टक्के) अर्जांचे संकलन होऊ शकलेले नाही.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे. EFs (प्रपत्र) वाटपाचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित टप्प्यातील कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने यंत्रणेला निर्देश दिले आहेत.

ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी
डिजिटायझेशनच्या कामात ग्रामीण भागातील मतदारसंघांनी जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा अधिक वेग नोंदवला आहे.
दिंडोरी (अ.ज.): ९०.९७%
इगतपुरी (अ.ज.): ९०.७१%
येवला: ८९.७९%
कळवण (अ.ज.): ८९.६८%
चांदवड: ८९.५४%

शहरी भागात अनकलेक्टेड अर्जांची संख्या मोठी

Advertisement

मतदार उपलब्ध न होणे किंवा स्थलांतरित होणे या कारणांमुळे नाशिक शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये अप्राप्त अर्जांची टक्केवारी सर्वाधिक आहे.
नाशिक पश्चिम: १,९३,७४१ (३९.२८%)
नाशिक पूर्व: १,६१,२३४ (३८.७२%)
नाशिक मध्य: १,२१,५७१ (३४.६७%)
देवळाली (अ.जा.): ७७,२६७ (२६.०५%)
मालेगाव मध्य: ७४,६९८ (२३.४७%)
सर्वात कमी अनकलेक्टेड अर्ज दिंडोरी (९.०३%), इगतपुरी (९.२९%) आणि येवला (१०.२१%) या मतदारसंघांमध्ये नोंदवले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय अनकलेक्टेड अर्जांची स्थिती

विधानसभा मतदारसंघअप्राप्त (Uncollectable) अर्जप्रमाण (%)
नाशिक पश्चिम १,९३,७४१ (३९.२८%)
नाशिक पूर्व १,६१,२३४ (३८.७२%)
नाशिक मध्य १,२१,५७१ (३४.६७%)
देवळाली (अ.जा.) ७७,२६७ (२६.०५%)
मालेगाव मध्य ७४,६९८ (२३.४७%)
मालेगाव बाह्य ६८,६६५ (१७.६२%)
निफाड ४८,२१८ (१५.९१%)
नांदगाव ४४,७५४ (१२.९७%)
सिन्नर ४२,४५६ (१२.९७%)
बागलाण  (अ.ज.) ४३,४२० (१४.४६%)
चांदवड ३२,६१६ (१०.४६%)
येवला ३३,८०५ (१०.२१%)
कळवण (अ.ज.) ३१,३४७ (१०.३२%)
दिंडोरी (अ.ज.) ३०,२५५ (९.०३%)
इगतपुरी (अ.ज.) २६,१९७ (९.२९%)

नागरिकांना आपल्या नाव नोंदणीची किंवा यादीतील स्थितीची पडताळणी करायची असल्यास भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत Voter Services Portal ला भेट देऊन अधिक माहिती मिळवता येईल.

Advertisement

Comments

No comments yet.