स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात गोंधळ... तरुणांना शाळाबाहेर काढले... पुढं हे कांड झालं...

Share:
Main Image
Last updated: 18-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १८ ऑगस्ट - स्वातंत्र्यदिन कार्यक्रमादरम्यान गोंधळ घालणाऱ्या शाळाबाहेरील तरुणांना आवारातून बाहेर काढल्याच्या रागातून दोन गट आमने-सामने येत तुफान दगडफेक केल्याची घटना घडली. सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात शनिवारी (दि. १५) सकाळी ही घटना घडली. दगडफेकीत शाळेच्या पत्र्याच्या शेडवर दगड पडल्याने किरकोळ नुकसान झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अशी घडली घटना

सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Advertisement

गोंधळ अन् हकालपट्टी: कार्यक्रम सुरू असताना शाळाबाहेरील काही तरुण विनाकारण आवारात घुसले आणि त्यांच्यात आपापसात गोंधळ सुरू झाला. हा प्रकार लक्षात येताच उपस्थित शिक्षक आणि पालकांनी मध्यस्थी करत या तरुणांना तत्काळ शाळेच्या आवारातून बाहेर काढून दिले.

शाळेबाहेर रस्त्यावर दगडफेक: आवारातून बाहेर काढल्याचा राग मनात धरून या तरुणांचे दोन गट शाळेबाहेरील रस्त्यावरच आपापसात भिडले. वाद विकोपाला जाऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली.

शाळेचे नुकसान: या तुफान दगडफेकीतील काही दगड शाळेच्या शेडवर जाऊन पडले, ज्यामुळे शेडचे किरकोळ नुकसान झाले.

या प्रकरणी प्रल्हाद बबनराव रायते (रा. बळवंतनगर, अशोकनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार तुषार देसले या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.