मनोहर शिंदे, (नाशिक) १७ ऑगस्ट - नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित 'जि. प. चित्रकला स्पर्धा २०२६' चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (१५ ऑगस्ट २०२६) त्र्यंबकेश्वर रोडवरील नवीन प्रशासकीय इमारतीत आयोजित विशेष समारंभात विजेत्यांचा दिमाखदार गुणगौरव सोहळा पार पडला. नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ओंकार पवार (I.A.S.) यांच्या शुभहस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) साईलता सामलेटी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या गुणगौरव सोहळ्यास जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे:
गट क्र. १ (इयत्ता १ ली ते ५ वी):
प्रथम: समिधा अंकुश रूपवते (जि. प. शाळा विल्होळी, ता. नाशिक)
द्वितीय: प्रज्वल गणेश गांगुर्डे (जि. प. शाळा गोसाणे, ता. कळवण)
तृतीय: उत्कर्षा प्रकाश भोये (जि. प. शाळा ढोबरपाडा वि., ता. पेठ)
गट क्र. २ (इयत्ता ६ वी ते १० वी):
प्रथम: विशाल नारायण आगिवले (जि. प. शाळा भावली खुर्द, ता. इगतपुरी)
द्वितीय: भूमिका गोरख पारधी (जि. प. शाळा रखडगाव, ता. दिंडोरी)
तृतीय: संबोधी शरद गांगुर्डे (जि. प. शाळा पिंपळगाव बसवंत/रामाचे, ता. निफाड)
गट क्र. ३ (शिक्षक गट):
प्रथम: नलिनी बन्सीलाल अहिरे (जि. प. शाळा बाणगंगा नगर, ता. निफाड)
द्वितीय: मगर एस. व्ही. (जि. प. शाळा पिंपळद, ता. नाशिक)
तृतीय: उर्मिला रावसाहेब शिंदे (जि. प. शाळा पिंपरी, ता. दिंडोरी)
कलागुणांना वाव देणारा उपक्रम:
स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आयोजित या सोहळ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी सर्व विजेत्यांचे कौतुक केले व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी असे उपक्रम मैलाचा दगड ठरतात, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास उपस्थित सर्व पालक व शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाचे मनापासून आभार मानले.