श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीची चिन्हे... जिल्हाधिकारी म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 16-Aug-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १६ ऑगस्ट - श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या पार्श्वभूमीवर रविवार, १६ ऑगस्ट आणि सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर शहरात भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन सर्च ट्रेंड्सनुसार यंदा भाविकांच्या संख्येत मोठी वाढ दिसत असून, संभाव्य वाहतूक कोंडी व गैरसोय टाळण्यासाठी भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल, त्र्यंबक नगरपालिका आणि महावितरण या सर्व यंत्रणांच्या समन्वयातून भाविकांच्या सोयीसाठी चोख नियोजन करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या भाविकांना महत्त्वाच्या सूचना:

वाहतूक शिस्त: वाहनचालकांनी लेन कटिंग, विरुद्ध दिशेने (रॉंग साईड) वाहन चालवणे आणि रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे वाहने उभी करणे पूर्णपणे टाळावे. प्रशासनाने आखून दिलेल्या मार्गांचाच वापर करावा.

Advertisement

प्रवास टाळण्याचे आवाहन: प्रचंड गर्दी लक्षात घेता कुटुंबातील गर्भवती महिला, स्तनदा माता, गंभीर आजारी व्यक्ती तसेच ० ते ५ वर्षे वयोगटातील लहान मुले यांनी १६ व १७ ऑगस्ट रोजी त्र्यंबकेश्वर यात्रा करण्याचे शक्यतो टाळावे.

पार्किंग व चालण्याचे नियोजन: निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणापासून मंदिरापर्यंत काही अंतर पायी चालावे लागणार असल्याने भाविकांनी पूर्वतयारी करूनच यावे.

पाऊस व आरोग्याची काळजी: परिसरात पावसाचे वातावरण असल्याने प्रत्येकाने स्वतःसोबत पिण्याच्या पाण्याची बाटली व छत्री/रेनकोट ठेवावा.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नागरिकांनी ११२ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा. यात्रा सुखकर आणि सुरक्षित व्हावी यासाठी भाविकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.