Exclusive - नाशिकहून या शहरासाठी पुन्हा विमानसेवा... बुकिंग सुरू...

Share:
Main Image
Last updated: 15-Aug-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) १५ ऑगस्ट - नाशिकच्या विमान वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ओझर विमानतळावरून खंडित झालेली नाशिक-दिल्ली सकाळच्या सत्रातील विमानसेवा १ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा रुळावर येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या विमानाचे बुकिंग आता अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे.  

नवीन वेळापत्रकानुसार, हे विमान दिल्लीहून सकाळी ५:४० वाजता उड्डाण करेल आणि सकाळी ७:२० वाजता नाशिकमध्ये दाखल होईल. यामुळे व्यावसायिक आणि कामानिमित्त दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

सध्या ओझर विमानतळावरून सुरू असलेली सेवा:

सध्या नाशिकहून खालील ४ प्रमुख शहरांसाठी थेट व कनेक्टिंग विमानसेवा सुरू आहे:  

हैदराबाद (Hyderabad)  

Advertisement

दिल्ली (Delhi)  

अहमदाबाद (Ahmedabad)  

बंगळुरू (Bengaluru)  

गोवा विमानसेवेबाबत नाशिककरांची उत्सुकता:

दिल्ली सेवा सुरू होत असली, तरी नाशिककरांचे लक्ष मात्र बंद झालेल्या गोवा विमानसेवेकडे लागले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ही सेवा अत्यंत लोकप्रिय ठरली होती. नाशिक-गोवा थेट सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पर्यटन व्यावसायिकांकडून नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि विमान कंपन्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. ही सेवा लवकरात लवकर पूर्ववत व्हावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.