एस.के. खेडकर, (नाशिक) १५ ऑगस्ट - केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयातर्फे दिला जाणारा मानाचा ‘केंद्रीय अतिउत्कृष्ट सेवा पदक’ आणि ‘केंद्रीय उत्कृष्ट सेवा पदक’ (२०२६) पुरस्कार जाहीर झाला असून, यामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह नाशिक शहर, परिक्षेत्र आणि महाराष्ट्र पोलीस अकादमीतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाजी मारली आहे.
कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल नाशिक पोलीस दलाच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रमुख पुरस्कार विजेते अधिकारी:
उत्कृष्ट सेवा पदक:
संदीप कर्णिक (विशेष पोलीस महानिरीक्षक तथा पोलीस आयुक्त, नाशिक शहर)
श्रीकांत धिवरे (पोलीस अधीक्षक, जळगाव)
अश्विनी सानप (पोलीस अधीक्षक, नंदुरबार)
भारत तांगडे (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक)
अतिउत्कृष्ट सेवा पदक:
नंदकुमार टी. ठाकूर (पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी)
शहर व ग्रामीण कर्मचाऱ्यांचा गौरव:
अतिउत्कृष्ट सेवा पदक विजेते (शहर):
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. आंचल मुदगल, उपनिरीक्षक सलीम काझी, ज्ञानदेव राणे, सहाय्यक उपनिरीक्षक विजय लभडे, शेखर फरताळे, शेरखान पठाण, काशिनाथ बागुल आणि हवालदार प्रदीप म्हसदे.
उत्कृष्ट सेवा पदक विजेते (शहर):
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की, जगवेंद्रसिंग राजपूत, अंकुश चिंतामण, अशोक शरमाळे, रणजीत नलवडे; सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर; पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, चेतन श्रीवंत आणि हवालदार प्रशांत वालझाडे.
नाशिक ग्रामीण व परिक्षेत्र:
नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक घनशाम बाळाप, पोलीस उपनिरीक्षक किरण शेलार, सहाय्यक उपनिरीक्षक नवनाथ सानप यांच्यासह धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनीही पदकांवर आपले नाव कोरले.